रेणुकामाता मल्टीस्टेट पतसंस्थेचे संस्थापक संचालक योगेश भालेराव यांचे हृदयविकाराने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 05:28 PM2020-08-21T17:28:02+5:302020-08-21T17:59:29+5:30

रेणुकामाता मल्टीस्टेट पतसंस्थेचे संस्थापक संचालक योगेश चंद्रकांत भालेराव (वय ३७) यांचे हृदयविकाराने शुक्रवारी (२१आॅगस्ट) पहाटे निधन झाले.

Yogesh Bhalerao, Founder Director, Renukamata Multistate Credit Union, dies of heart attack | रेणुकामाता मल्टीस्टेट पतसंस्थेचे संस्थापक संचालक योगेश भालेराव यांचे हृदयविकाराने निधन

रेणुकामाता मल्टीस्टेट पतसंस्थेचे संस्थापक संचालक योगेश भालेराव यांचे हृदयविकाराने निधन

googlenewsNext

अहमदनगर : रेणुकामाता मल्टीस्टेट पतसंस्थेचे संस्थापक संचालक योगेश चंद्रकांत भालेराव (वय ३७) यांचे हृदयविकाराने शुक्रवारी (२१आॅगस्ट) पहाटे निधन झाले.

रेणुकामाता मल्टीस्टेटचे अध्यक्ष प्रशांत भालेराव यांचे ते लहान बंधू होत. त्यांच्यामागे मागे आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. भालेराव यांच्यावर नगरमधील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथील ते रहिवासी होते.पतसंस्थेचे संस्थापक संचालक म्हणून त्यांनी २००४ पासून जबाबदारी पार पाडली. रेणुकामाता मल्टीस्टेटच्या प्रगतीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.रेणुका प्रॉडक्शनचे ते अध्यक्ष होते. या माध्यमातून त्यांनी ‘माझी रेणुका माउली’ ही ४० भागांची मालिका प्रसारीत केली होती. अमरापूर (ता. शेवगाव) येथील रेणुकामाता देवस्थानचे ते विश्वस्त होते.

Web Title: Yogesh Bhalerao, Founder Director, Renukamata Multistate Credit Union, dies of heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.