भंडारदऱ्यातून विद्युत निर्मितीसाठी पाणी सोडले

By admin | Published: July 10, 2016 12:31 AM2016-07-10T00:31:48+5:302016-07-10T00:35:39+5:30

राजूर : अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात शनिवारी दिवसभर जोरदार पावसाच्या सरी बरसत असल्यामुळे सायंकाळी ६ वाजता भंडारदरा धरण २५ टक्के भरले.

Water from the reservoir left water for electricity generation | भंडारदऱ्यातून विद्युत निर्मितीसाठी पाणी सोडले

भंडारदऱ्यातून विद्युत निर्मितीसाठी पाणी सोडले

Next

राजूर : अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात शनिवारी दिवसभर जोरदार पावसाच्या सरी बरसत असल्यामुळे सायंकाळी ६ वाजता भंडारदरा धरण २५ टक्के भरले. मुळा धरणाच्या पाणलोटातही होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. दरम्यान, भंडारदरा धरणातून दुपारी पावणे बारा वाजता विद्युत निर्मितीसाठी ७५९ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरूवात झाली.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर दोन्ही धरणांच्या पाणलोटात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पावसाने जोरदार मुसंडी मारली. शनिवारी दिवसभर तालुक्याच्या सवर्दूर भागांत पावसाचा जोर चांगलाच वाढलेला होता. आदिवासी पट्टयात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भातखाचरे तुडुंब भरलेली असून ओढे-नालेही दुथडी भरून वाहू लागले आहेत. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात दिवसभर धो- धो सरी बरसल्या. भंडारदरा येथे बारा तासांत तब्बल ६४ मि.मी. पावसाची नोंद झाली, तर धरणात ४२९ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक होत धरण २५ टक्केहून अधिक भरले. म्हणजेच धरणातील पाणीसाठा सायंकाळी ६ वाजता २ हजार ८८८ दलघफू झाला होता. कळसूबाई शिखराच्या परिसरातही जोरदार सरी बरसत असल्यामुळे ओढ्या-नाल्यांना पूर आला आहे. वाकी येथील प्रकल्पावरून १ हजार ५७४ क्युसेक वेगाने पाणी नदीपात्रात पडत आहे. त्यामुळे कृष्णवंती ही उपनदीही दुथडी भरून वाहू लागली आहे. यामुळे निळवंडे धरणातही पाण्याची आवक वाढत असून सायंकाळी ६ वाजता या धरणातील पाणीसाठा ६८३ दलघफू इतका झाला होता. हरिचंद्र गडाच्या परिसरात मुसळधार पावसाच्या सरी बरसत होत्या. या खोऱ्यातील १८२ द.ल.घ.फू क्षमतेचा कोथळे येथील लघुपाटबंधारे प्रकल्प सकाळी ६ वाजता भरून वाहू लागला. या खोऱ्यातील आंबीत, बलठण, शिरपुंजे या अगोदरच भरले आहेत. या परिसरात होत असलेल्या पावसामुळे मुळेच्या विसर्गातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.राजूर परिसरातही दिवसभर जोरदार पावसाच्या सरी बरसल्या, यामुळे डोंगररांगाही ओल्याचिंब झाल्या असून प्रथमच डोंगरमाथ्यावरून आता छोटे छोटे धबधबे प्रवाही होऊ लागले आहेत. सकाळी ६ वाजता संपलेल्या २४ तासांत नोंद झालेला पाऊस असा - घाटघर ७५ मि.मी., रतनवाडी ६६ मि.मी., पांजरे ४५ मि.मी., वाकी ३६ मि. मी. (वार्ताहर)

Web Title: Water from the reservoir left water for electricity generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.