Villages in Panchkroshi participated in Shirdi Dam; Neelam bulls call for non-compliance | शिर्डी बंदमध्ये पंचक्रोशीतील गावेही सहभागी; बंद न पाळण्याचे नीलम गोऱ्हे यांचे आवाहन
शिर्डी बंदमध्ये पंचक्रोशीतील गावेही सहभागी; बंद न पाळण्याचे नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

शिर्डी : साई जन्मस्थळाच्या मुद्द्याची दाहकता वाढत असून शिर्डीने रविवारपासून पुकारलेल्या बेमुदत बंदमध्ये पंचक्रोशीतील अनेक गावे सहभागी होत आहेत़ बंद काळात साईमंदिर दर्शनासाठी खुले राहणार असून प्रसादालयही सुरू राहणार आहे़ दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती डॉ़ नीलम गोºहे यांनी साईबाबांचे दर्शन घेत बंद न पाळण्याचे आवाहन शिर्डीकरांना केले़

रविवारपासून बेमुदत बंद संदर्भात पंचक्रोशीतील पदाधिकाऱ्यांनीही शिर्डीकरांबरोबर बैठक घेऊन आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार असल्याचे स्पष्ट केले़ या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, विजय कोते, शिवाजी गोंदकर, नितीन कोते आदी उपस्थित होते़ राहाता, अस्तगाव, पुणतांबा, डोºहाळे, एकरूखे, शिंगवे, नांदुर्खी, सावळीविहीर, निघोज निमगाव, वडझरी, पिंपळस, साकुरीसह अनेक गावे बंदमध्ये सहभागी होणार आहेत. शनिवारी सायंकाळी ग्रामसभा होत असून तत्पूर्वी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे बैठक घेणार आहेत़

मुख्यमंत्री वादावर तोडगा काढतील

साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत कोणी कितीही दावे-प्रतिदावे केले तरी साईभक्तांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री परिपक्व आहेत. त्यांनी जन्मस्थळाचा उल्लेख का केला माहिती नाही़ ते जन्मस्थळाच्या नामोल्लेखाच्या वादावर नक्कीच तोडगा काढतील. -दिगंबर कामत, माजी मुख्यमंत्री, गोवा

मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याचा विपर्यास झाला असावा. त्यामुळे शिर्डीकरांनी बंदची हाक देऊ नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संदर्भात शिर्डीकरांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत़ यासाठी त्यांना आपण विनंती केली आहे़ -डॉ़ नीलम गोºहे, उपसभापती, विधान परिषद

Web Title: Villages in Panchkroshi participated in Shirdi Dam; Neelam bulls call for non-compliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.