शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
2
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
3
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
4
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
5
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
6
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
7
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
8
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
9
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
10
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
11
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
12
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
13
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
14
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
15
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
16
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
17
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
18
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
19
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
20
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!

बनावट कागदपत्र तयार करुन ट्रस्टची जमीन हडपली; तत्कालीन नायब तहसीलदार, सबरजिस्ट्रारसह २४ जणांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 3:38 PM

बेलवंडी कोठार येथील मयत ट्रस्टी अंजनाबाई ढमढेरे यांच्या जागी दुसरी व्यक्ती जिवंत दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे ३ एकर ९ गुंठे जमीन हडपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

श्रीगोंदा : बेलवंडी कोठार येथील मयत ट्रस्टी अंजनाबाई ढमढेरे यांच्या जागी दुसरी व्यक्ती जिवंत दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे ३ एकर ९ गुंठे जमीन हडपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  या ट्रस्टचे सचिव चंद्रकांत काशीनाथ ढमढेरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तत्कालीन नायब तहसीलदार, तत्कालीन सबरजिस्टर यांच्यासह साक्षीदार, तत्कालीन तलाठी, मंडलाधिकारी अशा एकूण २४ जणांविरोधात मंगळवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गौतमचंद पुनमचंद बाठिया (रा. माणिकनगर, स्टेशनरोड, अनगर), सुभाष अर्जुन पवार (रा. बेलवंडी शुगर), नायब तहसीलदार महेश खेतमाळीस (रा.श्रीगोंदा), विजय मोरे (रा.श्रीगोंदा),रामदास थोरात (रा. लोणीव्यंकनाथ), राजू कोरे (रा.मढेवडगाव), चंद्रकांत शिनलकर (व्यवस्थापक बालाजी नागरी पतसंस्था, श्रीगोंदा), अन्सार शेख (रा श्रीगोंदा),अभिजित रेपाळे (रा.पारगाव सुद्रीक), अजित काकडे (रा.लोणीव्यंकनाथ, खरेदी घेणार), रामदास शेलार (रा.बेलवंडी), सतीश लगड (रा.कोळगाव), किशोर पवार (रा.बेलवंडी स्टेशन), नाना सय्यद (रा. रेल्वेस्टेशन,श्रीगोंदा), मोहन डांगे (रा.श्रीगोंदा कारखाना), सचिन भडांगे ( व्यवस्थापक श्रीगोंदा-आयडीबीआय बँक),बी डी पानसरे (कामगार तलाठी,बेलवंडी), हमशोद्दीन शेख(मंडलाधिकारी बेलवंडी),पांडुरंग निंभोरे (रा. घोटवी, विलास म्हस्के (रा.लोणीव्यंकनाथ), राजेंद्र क्षीरसागर (रा.श्रीगोंदा), अजित ओसवाल (आयडीबीआय बँक, श्रीगोंदा), श्रीगोंदा सबरजिस्टर (३ डिसेंबर २०१५ रोजी दाखल करण्यात आला आहे. या सर्व लोकांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ट्रस्टी मयत आहेत हे माहिती असून सुद्धा मयत ट्रस्टीच्या जागी दुसºयालाच उभे करून बनावट बेकायदेशीर दस्तऐवज तयार केले. बनावट ओळखपत्र, बोगस सह्या व अंगठ्याच्या आधारे सदर ट्रस्टची गट नं ७२८ मधील जमीन बळकावून फिर्यादी व ट्रस्टची फसवणूक करण्यात आली आहे, असे ढमढेरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव करीत आहेत..... 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाCrime Newsगुन्हेगारी