शेतकऱ्यांची व्यथा; एकरी खर्च २५ हजार, मिळणार आठ हजार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 02:47 AM2019-11-18T02:47:50+5:302019-11-18T06:20:30+5:30

अहमदनगरमध्ये सोयाबीन, बाजरी, कपाशी, कांदा पिकांचे नुकसान

The total cost will be 1 thousand, eight thousand | शेतकऱ्यांची व्यथा; एकरी खर्च २५ हजार, मिळणार आठ हजार

शेतकऱ्यांची व्यथा; एकरी खर्च २५ हजार, मिळणार आठ हजार

googlenewsNext

अहमदनगर : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवेळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. कपाशी, सोयाबीन, कांदा, बाजरी ही पिके भुईसपाट झाली. कांदा सडल्याने शेतकरी खचला. राज्य शासनाने प्रति हेक्टरला आठ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. प्रत्यक्षात नुकसान झालेल्या पिकांना एकाच एकरावरील पिकांसाठी २० ते २५ हजार रुपये खर्च झाला आहे. त्यामुळे सरकारची हेक्टरवरील पिकांसाठी (अडीच एकर) आठ हजार रुपये जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘लोकमत’ने अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी, श्रीगोंदा, नगर, पारनेर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांसाठी झालेल्या खर्चाची माहिती घेतली. राहुरी तालुक्यात सोयाबीनचे नुकसान झाले. नांगरणी (१६०० रुपये), हारू- रोटा वेटर (१२००)खुरपणी (५००), पेरणी (५००), खुरपणी (४०००), खुरपणी (१०००), खते (१२००) बियाणे (२१००), खळे (१५००), पाणी (२०००), शेतकरी श्रममूल्य (८०००) असा शेतकºयांनी सोयाबीन पिकावर एकरी २२ हजार ८०० रूपये खर्च केला. एकरी सोयाबीनचे एकरी उत्पादन ८ क्ंिवटल गृहीत धरले जाते़ सोयाबीनला ३५०० रूपये प्रतिक्ंिवटल भाव गृहीत धरला तर २८००० रूपये उत्पन्न मिळते़ शेतकऱ्यांना एकरी ५२०० रूपये नफा मिळाला असता. पारनेरचे शेतकरी कांतीलाल सोंडकर म्हणाले, कांदा लागवडीसाठी मजूर आळेफाटा, जुन्नरहून आणावे लागतात. दररोज दहा मजुरांना प्रत्येकी तीनशे रूपये रोजंदारी द्यावी लागते. तीन ते चार हजार खर्च खते, औषध फवारणीवर होतो. वीजबिलासह इतर मोठा खर्च आहे. लागवड ते काढणीपर्यंत दीड एकर क्षेत्रासाठीच ३२ हजार रूपये खर्च येतो.

हेक्टरी २५ हजार रूपयांचा खर्च करून शेतकरी बाजरीचे उत्पादन घेतो. बियाणे- १,५००, पेरणी- २,५००, काढणी- ६ हजार, खते व पाणी, सोंगणी आणि नांगरट प्रत्येकी ५ हजार, असा हेक्टरी जवळपास २५ हजार रूपयांचा खर्च येतो, असे सारोळा बद्दी (ता. नगर) येथील शेतकरी तुकाराम लांडगे यांनी सांगितले.

Web Title: The total cost will be 1 thousand, eight thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी