शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
6
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
7
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
8
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
9
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
10
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
11
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
12
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
13
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
14
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
15
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
16
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
17
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
18
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
20
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली

भाजपाच्या तिरंगा रॅलीत अपघात, आमदार मुरकुटेंसह तीन कार्यकर्ते किरकोळ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 1:58 PM

खुपटीजवळ मोटारसायकल एकमेकांत अडकून पडल्याने आमदार मुरकुटे यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली.

नेवासा (जि. अहमदनगर) : स्वातंत्र्य दिनानिमित्त नेवासा तालुका भाजप युवा मोर्चाने आयोजित केलेल्या तिरंगा मोटारसायकल रॅलीमधील मोटार सायकली एकमेकांत अडकून अपघात झाला.यामध्ये आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह तीन कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले आहेत. 

गुरुवारी सकाळी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत नेवासा ते श्री क्षेत्र देवगड दरम्यान ही मोटार सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदिरापासून रॅलीला सुरवात झाली होती. ही मोटारसायकल रॅली खुपटी, पानेगाव,सोनई,घोडेगाव,वडाळा,नेवासा फाटा मार्गाने जावून देवगड येथे समारोप होणार आहे. 

दरम्यान, खुपटीजवळ मोटारसायकल एकमेकांत अडकून पडल्याने आमदार मुरकुटे यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. तर भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष कृष्णा परदेशी, विलास बोरुडे, नाना शेंडे यांनाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांना नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर आमदार मुरकुटे हे पुन्हा तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले असल्याचे भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांनी सांगितले.

टॅग्स :NevasaनेवासाBJPभाजपा