शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

यंदा उदंड होणार साखर; नगर जिल्ह्यात ऊस उत्पादन दुपटीने वाढले

By मिलिंदकुमार साळवे | Published: November 10, 2017 6:17 PM

सन २०१७-१८ च्या गळीत हंगामासाठी अहमदनगर जिल्ह्यात १ लाख ४ हजार हेक्टर ऊस उपलब्ध आहे. साखर सहसंचालक कार्यालयाने मे महिन्यात ही आकडेवारी नोंदविली होती. त्यानंतर सातत्याने जोरदार पाऊस झाल्यामुळे या आकडेवारीत आणखीच भर पडणार आहे.

अहमदनगर : एकेकाळी साखरेचे आगार असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात दसºयाच्या सुमारास साखर कारखानदारीची भट्टी पेटल्यानंतर दिवाळीनंतर १ नोव्हेंबरपासून ऊस गळीत हंगामास सुरूवात झाली आहे. यावर्षी गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट ऊस असल्याने जिल्ह्यात या हंगामात उदंड साखर उत्पादन होणार आहे.जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांपैकी २२ कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे गाळपासाठी परवानगी मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केले होते. एफ. आर. पी.पोटी अब्जावधीची थकबाकी थकविल्याने माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे साईकृपा खासगी कारखाने आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यातील देवदैठण येथील कारखाना सुरू होत असताना हिरडगाव येथील दुसरा कारखाना मात्र एफ. आर.पी. च्या प्रलंबित प्रकरणामुळे गाळप परवाना मिळू शकलेला नाही. सन २०१७-१८ च्या गळीत हंगामासाठी अहमदनगर जिल्ह्यात १ लाख ४ हजार हेक्टर ऊस उपलब्ध आहे. साखर सहसंचालक कार्यालयाने मे महिन्यात ही आकडेवारी नोंदविली होती. त्यानंतर सातत्याने जोरदार पाऊस झाल्यामुळे या आकडेवारीत आणखीच भर पडणार आहे. मे महिन्यातील ऊस उपलब्धतेच्या आकडेवारीनुसार अहमदनगर जिल्ह्यात ७८ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा प्राथमिक अंदाज होता. हा अंदाज सततच्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे मागे पडून आता १ लाख मेट्रिक टनाहून अधिक उसाचे गाळप होईल, असा साखर सहसंचालक कार्यालयाचा नवा अंदाज आहे. दरवर्षी दसºयाच्या आसपास सुरू होणारा गळीत हंगाम यावर्षी उशिराने १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. हंगाम उशिरा सुरू केल्यामुळे कारखान्यांना आहे त्याच क्षेत्रात मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध झाला आहे. पावसामुळे ऊस उत्पादन वाढले आहे.गेल्या हंगामात सन २०१६-१७ मध्ये ६५ हजार हेक्टर एवढाच ऊस उपलब्ध होता. त्यापासून ३५ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले. यावर्षी ऊस दुप्पटीहून अधिक प्रमाणात उपलब्ध झाला आहे. तर साखर जवळपास तीन ते चार पटीने वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. श्रीरामपूरचा अशोक, कोपरगावचा संजीवनी, काळे, श्रीगोंदा, कुकडी, नेवाशाचा ज्ञानेश्वर, मुळा, पाथर्डीचा वृद्धेश्वर, अकोल्याचा अगस्ती, संगमनेरचा थोरात, खासगीमध्ये राहुरीचा प्रसाद, पारनेरचा पियुश, कर्जतचा अंबालिका, क्रांती, शेवगावचा गंगामाई, श्रीगोंद्याचा साईकृपा (देवदैठण) हे कारखाने सुरू झाले आहेत. केदारेश्वर कारखान्याची पहिली मोळी गव्हाणीत पडली आहे.

परवान्यासाठी तनपुरेची लढाई सुरूच

राहुरीच्या तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर पेटला असला, तरी अजून गाळप कारखाना मिळण्यासाठी या कारखान्याच्या संचालक मंडळाची कायदेशीर व राजकीय लढाई सुरू आहे. सहकार आयुक्त व सहकारमंत्र्यांसोबत सुनावणी होऊन या कारखान्याच्या गाळप परवान्याचा निर्णय मार्गी लागणार आहे.

मागील हंगाम सर्वांत नीच्चांकी

गेल्या साखर हंगामात राज्यात ३७३. १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपातून ४२०.०१ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले. २०१२-१३ पासून गेल्या वर्षाचा २०१६-१७ चा हंगाम अहमदनगर विभागाच्या दृष्टीने सर्वांत कमी ऊस व साखर उत्पादन झाल्यामुळे नीच्चांकी ठरला. यावर्षीच्या हंगामात संगमनेरच्या युटेक या नव्या खासगी कारखान्याची भर पडली आहे. जवळपास २२ कारखान्यांतून जिल्ह्यात गेल्यावर्षीपेक्षा तिप्पटीहून जास्त साखर तयार होईल, असा अंदाज आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने