अशी ही माणुसकी! भावाला जीवदान देण्यासाठी बहिणीचे मित्र-मैत्रिणी सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 01:00 PM2019-08-01T13:00:16+5:302019-08-01T13:01:55+5:30

दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत लिंपणगाव येथील बारकु वाल्हेकर याचा मुलगा शरद (वय28) यांची किडनी निकामी झाली.

Sister's friends collected money for brother kidney operation | अशी ही माणुसकी! भावाला जीवदान देण्यासाठी बहिणीचे मित्र-मैत्रिणी सरसावले

अशी ही माणुसकी! भावाला जीवदान देण्यासाठी बहिणीचे मित्र-मैत्रिणी सरसावले

Next

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) -  लिंपणगाव येथील शरद बारकु वाल्हेकर या गरीब शेतकरी कुंटुबातील युवकांवर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी "करा दान, वाचवा युवक मित्राचे प्राण" अशी मदत पेटी केली. या पेटीत जमा झालेली सुमारे 50 हजाराची रक्कम जमा झाली.

ही रक्कम विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ. एकनाथराव खांदवे यांचे हस्ते शरदची बहीण पुनम वाल्हेकर हीच्या कडे सुपूर्त केली. यावेळी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन काम करीत असलेल्या अग्नीपंख फौंडेशनने पाच हजाराची जाहीर ही मदत शरदच्या बॅक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. 

दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत लिंपणगाव येथील बारकु वाल्हेकर याचा मुलगा शरद (वय28) यांची किडनी निकामी झाली. वडिलांनी मुलासाठी किडनी देण्याचा  निर्णय घेतला. पण किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी 9 लाखाचा खर्च करणार असा प्रश्न निर्माण होता. श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयात टी. वाय. बी. ए. मध्ये शिकणार्‍या पुनमने आपल्या भावाची किडनी बदलायची आहे, त्यामुळे नऊ लाखाचा खर्च येणार आहे. पण घरची परिस्थिती नाजूक आहे.आई वडील चिंतेत आहेत. त्यावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील मुलीच्या भावाचे प्राण वाचविण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचा निर्णय घेतला. 

गुरुवारी कॉलेज भरण्यापूर्वी मदत पेटी केली आणि स्वइच्छेने मदत करण्याचे आवाहन केले. एक तासात या पेटीत 50 हजाराची रक्कम जमा केली. ही रक्कम प्राचार्य डॉ. एकनाथराव खांदवे व प्राध्यापक यांचे हस्ते पुनमकडे सुपूर्त केली. यावेळी पुनमच्या डोळ्यातून आनंदाश्रू तराळळले. पुनम वाल्हेकर म्हणाली की, मदत मिळाली ही आनंदाची बाब आहे. पण या मदतीत अनेकांचे हात लागले आहेत. त्यामुळे माझ्या प्राण नक्कीच वाचणार आहे.

Web Title: Sister's friends collected money for brother kidney operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.