शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

सांगवी ग्रामस्थ-वाळू तस्करांमध्ये संघर्ष पेटला; भोयटे यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 11:12 AM

श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी दुमाला ग्रामस्थ व वाळू तस्करांमधील संघर्ष विकोपाला गेला असून, मंगळवारी सायंकाळी सहा वाजता या वादातूनच एका वाळू तस्कराने नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक योगेश भोयटे यांच्या अंगावर वाळूने भरलेला ट्रक घालण्याचा प्रयत्न केला.

काष्टी : श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी दुमाला ग्रामस्थ व वाळू तस्करांमधील संघर्ष विकोपाला गेला असून, मंगळवारी सायंकाळी सहा वाजता या वादातूनच एका वाळू तस्कराने नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक योगेश भोयटे यांच्या अंगावर वाळूने भरलेला ट्रक घालण्याचा प्रयत्न केला. भोयटे यांच्या फिर्यादीवरुन श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगवीतील वाळू तस्करी बंद करावी म्हणून सांगवीचे ग्रामस्थ जिल्हाधिकारी अभय महाजन यांना बुधवारी भेटणार आहेत. मंगळवारी संध्याकाळी योगेश भोयटे व काही ग्रामस्थांनी भीमा नदीतून बेकायदेशीरपणे भरलेल्या तीन ट्रक अडविल्या. तुम्ही यापुढे गावातून वाहतूक वाहतूक करू नका, गावातील रस्ते खराब झाले आहेत, शालेय मुलांना जाणे अवघड झाले आहे, असे सांगत भोयटे यांनी वाळू वाहतुकीला विरोध दर्शविला. ग्रामस्थांचा आक्रमक बाणा पाहून ट्रक चालक ट्रकसोडून खाली उतरले. मात्र दिनकर नलगे हा ट्रक (क्रमांक एम़ एच़ १२, ई़ यु़ १५३) मध्ये चालक म्हणून बसला आणि भरधाव वेगाने ट्रक योगेश भोयटे यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.योगेश भोयटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनकर नलगे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वाळू वाहतूक पूर्णपणे बंद व्हावी, या मागणीसाठी सांगवीचे ग्रामस्थ आज (बुधवारी) जिल्हाधिकारी अभय महाजन यांची भेट घेणार आहेत. गावातून अवैध वाळू वाहतूक करु देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrimeगुन्हाShrigondaश्रीगोंदा