शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

सराफाचे १५ तोळ्याचे दागिने लुटले; कोपरगाव तालुक्यातील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 5:44 PM

कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील एका सराफाला चोरट्यांनी रस्त्यात अडवून १५ तोळे सोने व २० हजार रुपयांची रोकड पळवून नेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चांदेकसारे ते पुणतांबा रस्त्यावर घडली.

कोपरगाव : तालुक्यातील जवळके येथील एका सराफाला चोरट्यांनी रस्त्यात अडवून १५ तोळे सोने व २० हजार रुपयांची रोकड पळवून नेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चांदेकसारे ते पुणतांबा रस्त्यावर घडली.जवळके येथील गायत्री ज्वेलर्सचे मालक महेंद्र मुरलीधर कुलकर्णी (रा.सिध्दीविनायक टॉवर, सप्तर्षी मळा, कोपरगाव) हे गुरुवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास आपले दुकान बंद करून कोपरगावच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून येत होते. यावेळी चांदेकसारे ते पुणतांबा फाटा दरम्यान अज्ञात तिघां चोरट्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यांना रस्त्यावरच असलेल्या माईल स्टोन हॉटेलजवळ साडेसात वाजता अडविले. त्यांना मारहाण व जीवे मारण्याची धमकी देऊन कुलकर्णी यांना कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळच असलेल्या शेतात घेऊन गेले. यावेळी चोरट्यांनी त्यांच्याकडून पिशवीतील अंदाजे १५ तोळे सोन्याचे दागिने, २० हजार रोख रक्कम, हिशोबाच्या वह्या व मोबाईल पळवून नेला. त्यांना यावेळी चोरट्यांनी मारहाण केली. कुलकर्णी यांना मोठ्या प्रमाणात मुका मार लागल्याने त्यांना प्राथमिक उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदर घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून रात्री उशिरा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी