ओबीसीमधून आरक्षण नको; पाथर्डी तालुक्यात आंदोलन पेटले, टायर जाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 12:27 PM2024-02-20T12:27:19+5:302024-02-20T12:28:22+5:30

आंदोलक संतप्त झाले त्यांनी महामार्गावरील टायर पेटवले त्यामुळे वाहतूकही मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली आहे.

No reservation from OBC; Agitation broke out in Pathardi taluka, tires were burnt | ओबीसीमधून आरक्षण नको; पाथर्डी तालुक्यात आंदोलन पेटले, टायर जाळले

ओबीसीमधून आरक्षण नको; पाथर्डी तालुक्यात आंदोलन पेटले, टायर जाळले

पाथर्डी (जि . आहमदनगर) :  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणास बसलेले मराठा नेते मनोज जरांगे यांच्या मूळ गाव मातोरी पासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर पाथर्डी तालुक्यात कीर्तन वाडी येथे गेल्या सात दिवसांपासून उपोषणास बसलेले प्रल्हाद कीर्तने यांनी ठाम भूमिका मांडत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये व सगेसोयऱ्यांचा अध्यादेश रद्द करावा या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. 
उपोषणादरम्यान आंदोलक संतप्त झाले त्यांनी महामार्गावरील टायर पेटवले त्यामुळे वाहतूकही मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली आहे.

येत्या बुधवार पासून पाणी त्याग करणार असल्याचे सांगितले आहे.

या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज खरवंडी परिसरात सर्वपक्षीय रास्ता रोको व बंदचे आवाहन करण्यात होते. काल पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रताप ढाकणे,ओबीसी चळवळीचे मुख्य संयोजक दिलीप खेडकर,बाळासाहेब सानप,भाजपा ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर आव्हाड, भिवाजी आघाव शशिकांत मतकर,राजू कीर्तने गोरक्षनाथ गिरी,समता परिषदेचे रमेश गोरे,आम आदमी पक्षाचे किसन आव्हाड,आदी सह तालुक्यातील अनेक ओबीसी नेत्यांनी उपोषण ठिकाणी भेट देत उपोषण कर्ते प्रल्हाद कीर्तने यांच्या भावना जाणून घेतल्या. 

दरम्यान महसूल प्रशासनातील अधिकारी चर्चा करण्यासाठी उपलब्ध झाले नसल्याने आंदोलक चिडले आणि त्यांनी रस्त्यावर टायर जाळून निषेध केला. यामुळे पाथर्डी रोडवर वाहतूक ठप्प झाली आहे.

Web Title: No reservation from OBC; Agitation broke out in Pathardi taluka, tires were burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.