Motorcycle crash Two policemen injured | मोटारसायकलची बिबट्याला धडक; दोन पोलीस जखमी

मोटारसायकलची बिबट्याला धडक; दोन पोलीस जखमी

बेलवंडी : मोटारसायकलला बिबट्या अचानक आडवा आल्याने झालेल्या अपघातात दोन पोलीस जखमी झाले. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव शिवारातील रस्त्यावर शनिवारी (दि.२८ मार्च) रोजी सकाळी  साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. 
        कोरोना व्हायरसच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव शेलार व  अजिनाथ  खेडकर हे गव्हाणेवाडी चेक पोस्ट येथील दिवसपाळी ड्युटीवर होते. ते दोघे ड्युटी संपवून मोटारसायकलवरून माघारी येत असताना उक्कडगाव शिवारात मोटारसायकलला बिबट्या आडवा आला. यामुळे ते मोटारसायकलरुन पडून जखमी झाले आहेत. अपघातात अजिनाथ खेडकर यांना पायास व डोक्यास मार लागला असून नामदेव शेलार यांना खरचटले आहे. बेलवंडी येथील खाजगी रुग्णालयातील उपचार करण्यात आले, अशी माहिती पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी दिली. 
 

Web Title: Motorcycle crash Two policemen injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.