देशातील शेतकरी मोदींच्या बरोबर, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 10:50 AM2021-01-01T10:50:24+5:302021-01-01T10:51:15+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बनवण्यात आलेले शेतक-यांसाठीचे तीनही कायदे शेतक-यांच्या हिताचे आहेत. ज्यांचा विरोध आहे त्यांचे समाधानही होईल, यासाठी चर्चा सुरू आहे. देशातील शेतकरी मोदींच्या मागे उभे आहेत, जे शेतकरी समजले नाही त्यांनाही समजेल आणि नविन वर्ष चांगले जाईल, असे मत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी शिर्डीत व्यक्त केले.

Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chavan, along with farmers in the country, claims Modi | देशातील शेतकरी मोदींच्या बरोबर, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांचा दावा

देशातील शेतकरी मोदींच्या बरोबर, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांचा दावा

Next

शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बनवण्यात आलेले शेतक-यांसाठीचे तीनही कायदे शेतक-यांच्या हिताचे आहेत. ज्यांचा विरोध आहे त्यांचे समाधानही होईल, यासाठी चर्चा सुरू आहे. देशातील शेतकरी मोदींच्या मागे उभे आहेत, जे शेतकरी समजले नाही त्यांनाही समजेल आणि नविन वर्ष चांगले जाईल, असे मत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी शिर्डीत व्यक्त केले.

मुख्यमंत्री चव्हाण अनेक वर्षांची परंपरा कायम ठेवत यंदाही नववर्षाचा श्रीगणेशा साईदर्शनाने करत आहेत. या निमित्ताने नववर्षाच्या पूर्वसंध्येला साईनगरीत दाखल झालेल्या चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. २०२० वर्ष संकट, दु:ख व कष्टाने भरलेले होते. कोरोनाने अर्थव्यवस्था कोलमडली, अनेकांचे प्राण गेले. या वर्षाला निरोप देतांनाच कोरोना या देशातून व जगातून जावो. अर्थव्यवस्था सुरळीत होवो. सर्वांचे कल्याण होवो यासाठी आपण बाबांना साकडे घातल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

या वर्षात अर्थव्यवस्था मजबूत करणे, रोजगार निर्मीती करणे, शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणे. राज्यातील आया-बहिणींना अधिक सुरक्षीतता उपलब्ध करणे व गुंडगिरी संपवणे हा आपला नवीन वर्षाचा संकल्प असल्याचेही चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितले. 

Web Title: Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chavan, along with farmers in the country, claims Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.