शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

दडपशाहीच्या मार्गाने चित्रपटावर बंदी आणणे चुकीचे; अविनाथ पाटील यांनी मांडली अंनिसची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 7:05 PM

सिनेमांतील विषयांवरून वाद-विवाद, आक्षेप असू शकतात, परंतु म्हणून कलाकृतीच्या सादरीकरणाला दडपशाहीच्या मार्गाने बंदी आणणे चुकीचे आहे. सध्या चर्चेत असणा-या दुर्गा, न्यूड, दशक्रिया व पद्मावती चित्रपटांतील वादग्रस्ततेचे स्वागत असले, तरी अंधश्रद्धा निर्मूलन समिती कलेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार, अशी भूमिका अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केली.

अहमदनगर : सिनेमांतील विषयांवरून वाद-विवाद, आक्षेप असू शकतात, परंतु म्हणून चित्रपटांच्या सादरीकरणाला दडपशाहीच्या मार्गाने बंदी आणणे चुकीचे आहे. सध्या चर्चेत असणा-या दुर्गा, न्यूड, दशक्रिया व पद्मावती चित्रपटांतील वादग्रस्ततेचे स्वागत असले, तरी अंधश्रद्धा निर्मूलन समिती कलेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार, अशी भूमिका अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.सध्या काही चित्रपटांच्या विषयांवरून वादंग उठले आहेत. दुर्गा सिनेमातील स्त्रीच्या शरीराची उपभोग वस्तू म्हणून केल्या जाणा-या प्रदर्शनाच्या मुद्द्यावर, न्यूड सिनेमाच्या नावाबद्दल, दशक्रियामध्ये ब्राम्हण्य व्यवस्थेतील शोषणाबद्दल, तर पद्मावती चित्रपटात ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाच्या सादरीकरणाबद्दल आक्षेप घेतले गेले आहेत. भारतीय समाज हा चित्रपटाच्या मोठ्या प्रवाहात वावरणारा असल्याने चित्रपट व्यवसायातील चांगल्या व वाईट घडामोडींचा व समाजातील इतर संबंधित घटकांचा एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक निकोप, संवादी असणे आवश्यक वाटते. चित्रपट बंदीला जात, धर्म व्यवस्था, त्यांचे बळकटीकरण या अंगाने अधिक गांभीर्याने पाहावे लागेल. ज्यांना भारत एकसंध नको आहे, अशा संघटना सातत्याने जातीय अस्मिता, अहंकार जागृत करून त्या समाजाला अधिकच जातीयग्रस्त करत आहेत. आज समाजात प्रत्येक जात एखाद्या मुद्द्यावरून एकटी लढत आहे आणि हे घातक आहे. यातून समूहाची एकाधिकारशाही बळकट होते. ‘पद्मावती’सारख्या चित्रपटाचा विषय जर मध्यमयुगीन असेल, तर आपली दृष्टी मध्ययुगीन ठेवून चालेल का? केवळ एक कलाकृती एवढंच महत्त्व देऊन चित्रपट पाहायला हवा. एकदा सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिल्यानंतर त्यावर पब्लिक सेन्सॉरशिप चालणार नाही. याविरोधात सर्व लेखक, कवी, कलावंतांनी एकत्र येऊन कायदेशीर लढाई लढावी लागेल. नाहीतर कोणाच्या तरी भावना दुखावल्या या सदराखाली रोजच कलेचा श्वास कोंडला जाईल. अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाहीचा प्राण आहे. त्यांच्या संरक्षणासाठी अधिक आग्रही राहावे लागेल. अन्यथा, येथील जात-जमातवादी मानसिकता कलावंतांचा एम.एफ. हुसेन केल्याशिवाय राहणार नाही, असे पाटील म्हणाले. अंधश्रद्धा निर्मूलन समिती या निमित्ताने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याच्या हेतूने अशा कलाकृती लोकांनी पाहाव्यात यासाठीची प्रचार मोहीम राबवणार असल्याचेही पाटील म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPadmavatiपद्मावती