Independence in Loni Khurd; BJP leader Vikhe Patil pushed | लोणी खुर्दमध्ये सत्तांतर; भाजप नेते विखे पाटलांना धक्का

लोणी खुर्दमध्ये सत्तांतर; भाजप नेते विखे पाटलांना धक्का

लोणी : राहाता तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या लोणी खुर्द ग्रामपंचायतीचा निकालही धक्कादायक लागला. या ग्रामपंचायतीत भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचा पराभव झाला.  विखे  विरोधी गटाच्या परिवर्तन पॅनलला ११ तर  विखे गटाला सहा जागा मिळाल्या.

लोणी खुर्द ग्रामपंचायतीत एकूण १७ जागांसाठी निवडणूक झाली. गेल्या वीस वषार्पासून या ग्रामपंचायतीवर माजी मंत्री, भाजपचे नेते राधाकृष्ण विखे यांच्या गटाचे वर्चस्व होते. येथे माजी आमदार चंद्रभान घोगरे यांचे चिरंजीव जनार्दन घोगरे यांच्या परिवर्तन पॅनलमध्ये चुरशीची निवडणूक झाली. यात परिवर्तन पॅनलने ११ जागा जिंकल्या. तर विखे गटाला ६ जागेवरच समाधान मानावे लागले.

Web Title: Independence in Loni Khurd; BJP leader Vikhe Patil pushed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.