Illegal sand transport dumper, JCB seized | अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा डंपर, जेसीबी जप्त

अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा डंपर, जेसीबी जप्त

संगमनेर : अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा ढंपर व जेसीबी संगमनेर तहसील कार्यालयातील अधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक शोध पथकाने पकडला. बुधवारी (दि. २) सकाळी साडे सहाच्या सुमारास तालुक्यातील खांडगाव शिवारात ही कारवाई करण्यात आली.

तहसीलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक शोध पथकातील तलाठी योगिता शिंदे, तलाठी संग्राम देशमुख व तलाठी संजय शितोळे हे गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना खांडगाव शिवारातील कालिका माता मंदिरापासून प्रवरा नदीपात्राकडे जाणा-या रस्त्याहून अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. हे पथक कारवाईसाठी जात असताना त्यांना एका शेतात ढंपर व जेसीबी सुरू असल्याचे दिसले. पथकाने तेथे जावून पाहिले असता त्यांना ढंपरमध्ये वाळू तसेच वाळू उपशासाठी, ढंपरमध्ये वाळू भरण्यासाठी वापरण्यात आलेला जेसीबी व मोठ्या प्रमाणात वाळू साठा तेथे आढळून आला.

या पथकाने वाळूने भरलेला ढंपर, जेसीबी ताब्यात घेतला. ढंपरमधील चार ब्रास व साठविलेली १५ ब्रास अशी एकुण २० ब्रास वाळू कारवाई दरम्यान जप्त करण्यात आली. पंचनाम्यानंतर पुढील कारवाईसाठी तहसीलदार निकम यांच्याकडे अहवाल सादर केल्याचे तलाठी शिंदे यांनी सांगितले.

 

Web Title: Illegal sand transport dumper, JCB seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.