शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
3
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
4
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
5
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
6
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
7
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
8
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
9
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
10
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
11
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
12
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
13
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
14
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
15
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
16
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
17
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
18
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
19
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
20
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान

जिल्हाधिका-यांमुळे पहिल्यांदाच महापालिकेची सभा शिस्तीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 6:22 PM

महपालिकेच्या सभेत आक्रमक बोलणारे, चेष्टा-मस्करी करून विषयाचे गांभीर्य घालविणारे, मुद्द्याऐवजी राजकारणावर बोलणा-या नगरसेवकांनी शुक्रवारच्या सभेत अभ्यासपूर्ण आणि शिस्तीत मांडणी केली.

अहमदनगर : महपालिकेच्या सभेत आक्रमक बोलणारे, चेष्टा-मस्करी करून विषयाचे गांभीर्य घालविणारे, मुद्द्याऐवजी राजकारणावर बोलणा-या नगरसेवकांनी शुक्रवारच्या सभेत अभ्यासपूर्ण आणि शिस्तीत मांडणी केली. जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी सभेला हजर राहिल्याने विषय सोडून सभा लांबविणा-या नगरसेवकांवरही चांगलाच अंकुश बसला. सीना नदी साफसफाई आणि महापालिकेला शिस्त लावल्याबद्दल सर्वच नगरसेवकांनी द्विवेदी यांच्या अभिनंदनाचा ठराव बाके वाजवून संमत केला.महापालिका स्थापन झाल्यानंतरच्या १५ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी या पदावरील व्यक्ती महापालिकेच्या सभेला हजर राहिली. प्रभारी आयुक्त असलेल्या द्विवेदी यांनी सुरवातीलाच विषयांतर न करण्याची ताकीद देवून नगरसेवकांना पहिलाच दणका दिला. त्यामुळे सर्वच नगरसेवकांनी त्यांची मते अभ्यासपूर्ण, शांततेत आणि शिस्तीत मांडली. सभागृहातील अधिका-यांची विंग रिकामीच असल्याने गणेश भोसले यांनी यावर आक्षेप घेतला. महापौरांचा वचक राहिलेला नाही, अशी टीका त्यांनी केली. मात्र गाळ््यांचा एकच विषय सभेत असल्याने आणि अन्य विषयांवर चर्चा होणार नसल्याने अन्य अधिका-यांना सभेला बोलविले नाही, असा खुलासा द्विवेदी यांनी केला.महापालिका स्थापन झाल्यापासून उपविधी तयार करण्यात आले नाहीत. असे नियम केले असले तर गाळेधारकांचा प्रश्न निर्माण झाला नसता असे सांगत दिलीप सातपुते यांनी गाळेधारक, अवैध बांधकाम करणारे महापालिकेच्या तिजोरीवर कसा डल्ला मारतात, याचा प्रवास सविस्तरपणे सांगितला. शौचालय पाडून गाळे बांधणा-या मार्केट कमिटीवर कारवाईची सातपुते यांनी मागणी केली. अनिल शिंदे यांनी गाळ््यांना रेडीरेकनरनुसार आकारले जाणारे भाडे अन्यायकारक असल्याने फेरसर्वे करण्याची मागणी लावून धरली. रेडीरेकनरची व्याख्या समजावून सांगण्याचा आग्रह सचिन जाधव यांनी सहायक नगररचना उपसंचालक राजेश पाटील यांच्याकडे लावून धरला.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका