अकोले मतदारसंघातून शक्तिप्रदर्शन करीत राष्ट्रवादीचे  डॉ. किरण लहामटे यांचा अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 02:38 PM2019-10-03T14:38:55+5:302019-10-03T14:39:50+5:30

अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. किरण यामाजी लहामटे यांनी गुरुवारी पावणे बारा वाजता नामनिर्देशन पत्र दाखल केले. अकोले शहरातून फेरी काढून लहामटे यांनीही शक्तिप्रदर्शन केले.

Dr. NCP's NCP is showing strength from Akole constituency. Kiran Lahmte's application was filed | अकोले मतदारसंघातून शक्तिप्रदर्शन करीत राष्ट्रवादीचे  डॉ. किरण लहामटे यांचा अर्ज दाखल

अकोले मतदारसंघातून शक्तिप्रदर्शन करीत राष्ट्रवादीचे  डॉ. किरण लहामटे यांचा अर्ज दाखल

googlenewsNext


अकोले : अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. किरण यामाजी लहामटे यांनी गुरुवारी पावणे बारा वाजता नामनिर्देशन पत्र दाखल केले. अकोले शहरातून फेरी काढून लहामटे यांनीही शक्तिप्रदर्शन केले.
शिवनेरीहून शिवाई देवीचे गुरुवारी पहाटे दर्शन घेऊन लहामटे अकोले येथे आले. युवकांनी घोषणा देत शहरातून फेरी काढली. त्यानंतर तहसीलदार कार्यालयात जावून निवणूक अधिकारी उदय किसवे यांचे कडे अर्ज  दाखल केला.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे, आदिवासींचे नेते अशोक भांगरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत, काँगेस तालुकाध्यक्ष दादा पाटिल वाकचौरे आदी उपस्थित होते.
अगस्ती विद्यालय समोरील लहामटे यांच्या कार्यालयात  कार्यकर्त्यांची सभा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Web Title: Dr. NCP's NCP is showing strength from Akole constituency. Kiran Lahmte's application was filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.