शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

जामखेडमध्ये तिघांंना कोरोनाची लागण; जिल्ह्याचा आकडा पोहोचला आठवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 3:06 PM

दोन दिवसांपूर्वी परदेशी दोन जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता पुन्हा त्यांच्या संपर्कात आलेले जामखेड येथील तीन जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाचे लोन आता नगर शहराबाहेरही पसरले असल्याचे दिसते आहे. 

अहमदनगर : दोन दिवसांपूर्वी परदेशी दोन जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता पुन्हा त्यांच्या संपर्कात आलेले जामखेड येथील तीन जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाचे लोन आता नगर शहराबाहेरही पसरले असल्याचे दिसते आहे.      १४ मार्च रोजी १४ परदेशी पाहुणे नगर जिल्ह्यात दाखल झाले होते. त्यातील एक फ्रान्स व दुसरा आयव्हरी येथील होता. या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित बारा जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. परंतु या परदेशी पाहुण्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधण्याचे काम प्रशासनाकडून सुरू होते. परदेशी लोक संगमनेर, जामखेड, राहुरी, नेवासा, नगर शहरातील मुकुंदनगर भागातही राहून गेले आहेत. त्यामुळे येथील अनेक जण त्यांच्या संपर्कात आल्याने प्रशासनाने या सर्वांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात बोलावले होते. त्यापैकीच जामखेड येथील तीन जणांना कोरणा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी (३१ मार्च) त्यांचा अहवाल पुणे येथील लॅबकडून मिळाला. आता या पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कातील लोकांना शोधण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यात कोरनाबाधित यांची संख्या आठवर पोहोचली आहे. त्यातील एकाला तीन दिवसांपूर्वी डिस्चार्ज मिळाला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य