जीएसटीतील किचकट पद्धतीत सुधारणा करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:21 AM2021-01-25T04:21:51+5:302021-01-25T04:21:51+5:30

याबाबत संघटनेच्या वतीने अ‍ॅड.पुरुषोत्त रोहिडा, कर सल्लागार आनंद लहामगे, सुनील कराळे, सुनील फळे, अ‍ॅड. प्रसाद किंबहुणे, सुनील ...

The complicated system of GST should be improved | जीएसटीतील किचकट पद्धतीत सुधारणा करावी

जीएसटीतील किचकट पद्धतीत सुधारणा करावी

Next

याबाबत संघटनेच्या वतीने अ‍ॅड.पुरुषोत्त रोहिडा, कर सल्लागार आनंद लहामगे, सुनील कराळे, सुनील फळे, अ‍ॅड. प्रसाद किंबहुणे, सुनील सरोदे यांनी पवार यांना निवेदन दिले. कर पद्धतीत सुटसुटीतपणा आणावा, विलंब शुल्क कमी करावे, फाईल अपलोड करण्यास पुरेसा वेळ द्यावा अशा मागण्या केल्या आहेत. रात्रंदिवस काम करून जीएसटीच्या फाईल कराव्या लागतात. त्यातही पोर्टल व्यवस्थित चालत नसल्याने फाईल अपलोड करताना तासन्तास घालावे लागतात. फाईल लेट झाल्यास त्याचा व्यापाऱ्यांना दंड भरावा लागतो. त्यामुळे कर सल्लागार आणि व्यापाऱ्यांमध्येही वादावादीचे प्रसंग उद्भवतात. या सर्व अडचणींमुळे कर सल्लागार मोठ्या मानसिक दडपणाखाली काम करत आहे. केंद्र सरकार करपद्धतीत दररोज नवनवीन बदल करीत असल्याने कर सल्लागार हैराण झाले आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने धोरणात बदल करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री यांच्याशी चर्चा करून कर पद्धतीतील क्लिष्टता दूर करण्याबाबत पवार यांना साकडे घालण्यात आले आहे.

फोटो २४ निवेदन

ओळी- जीएसटी धोरणातील किचकट पद्धतीमध्ये बदल करावा, या मागणीचे निवेदन अहमदनगर डिस्ट्रिक्ट टॅक्स ब्रदर्सच्या वतीने खा. शरद पवार यांना देताना अ‍ॅड. रोहिडा पुरुषोत्तम, कर सल्लागार आनंद लहामगे, सुनील कराळे, सुनील फळे, अ‍ॅड. प्रसाद किंबहुणे, सुनील सरोदे आदी.

Web Title: The complicated system of GST should be improved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.