बांधकाम व्यावसायिक संजय गणपत गायकवाड यांची दीपावलीच्या दिवशी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 05:28 AM2017-10-23T05:28:28+5:302017-10-23T05:28:30+5:30

राहाता (जि. अहमदनगर) : येथील बांधकाम व्यावसायिक संजय गणपत गायकवाड यांनी दीपावलीच्या दिवशी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Builder Sanjay Ganpat Gaikwad commits suicide on the day of Diwali | बांधकाम व्यावसायिक संजय गणपत गायकवाड यांची दीपावलीच्या दिवशी आत्महत्या

बांधकाम व्यावसायिक संजय गणपत गायकवाड यांची दीपावलीच्या दिवशी आत्महत्या

googlenewsNext

राहाता (जि. अहमदनगर) : येथील बांधकाम व्यावसायिक संजय गणपत गायकवाड यांनी दीपावलीच्या दिवशी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी संजय यांनी पाच व्यक्तींची नावे लिहून ठेवली असल्याने राहाता शहरात एकच खळबळ उडाली आहे.
संजय गणपत गायकवाड (४०, रा. गायकवाडवस्ती) हे स्थापत्य अभियंता होते. ते गेल्या अनेक वर्षांपासून राहाता व शिर्डी शहरात बांधकामाचा व्यवसाय करीत होते. त्यांनी गुरुवारी मध्यरात्री घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
‘सुनील ज्ञानेश्वर गायकवाड, भास्कर सावकार गायकवाड, सकाहारी भागवत धुमसे, राजेंद्र भागवत धुमसे, भाऊसाहेब दादा बनसोडे यांनी मी घेतलेल्या नगरपालिकेच्या कामात वेळोवेळी अडथळा निर्माण केला. तसेच हे सर्व एकत्र येऊन माझ्यावर दबाव आणायचे. या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येचे कारण चिठ्ठीतील नावे असलेल्यांना विचारा,’ असे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. राहाता पोलिसांनी चिठ्ठीत नावे असलेल्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी काही जणांची चौकशी केली जाणार आहे़ चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाणार आहे़ या कारवाईत काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे़ या आत्महत्येमुळे विभागात एकच खळबळ उडाली आहे़

Web Title: Builder Sanjay Ganpat Gaikwad commits suicide on the day of Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.