शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

पारनेरमध्ये औटी यांच्यासमोर कडवे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 5:12 PM

पारनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विजय औटी व राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात दुरंगी लढत होत आहे़. नेहमी तिरंगी लढतीचा फायदा मिळवणा-या औटी यांच्यासमोर सेनेचेच जुने कार्यकर्ते असलेले लंके यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. दुष्काळी मतदारसंघात पाणी आणण्यास प्राधान्य राहील हेच दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचे मुद्दे आहेत़.

पारनेर विधानसभा - विनोद गोळे । पारनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विजय औटी व राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात दुरंगी लढत होत आहे़. नेहमी तिरंगी लढतीचा फायदा मिळवणा-या औटी यांच्यासमोर सेनेचेच जुने कार्यकर्ते असलेले लंके यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. दुष्काळी मतदारसंघात पाणी आणण्यास प्राधान्य राहील हेच दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचे मुद्दे आहेत़.औटी हे चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत़. त्यांना विधानसभा उपाध्यक्षपदाची संधी मिळाल्याने राज्यातील प्रमुख लढतींमध्ये या लढतींचा समावेश होतो.  औटी, लंके यांसह बहुजन आघाडीच्या वतीने साठे, वंचित आघाडीचे डी. आऱ शेंडगे, जनता पक्षाचे प्रसाद खामकर व अपक्ष भाऊसाहेब खेडेकर असे सहा जण रिंगणात आहेत़. लंके हे पूर्वीचे सेनेचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या मागे युवकांचे मोठे संघटन आहे. सेनेतही त्यांचे अनेक चाहते आहेत. गत तीन वर्षांपासून  त्यांची विधानसभेची तयारी सुरू होती़. राष्ट्रवादीच्या प्रवेशावेळी कार्यकर्त्यांची जमविलेली गर्दी, शिवस्वराज यात्रेतील सभेची गर्दी व युवकांचे संघटन हेरून अजित पवार यांनी महिनाभर आधीच लंके यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर करून टाकली होती. लंके यांनी मतदारसंघात काढलेल्या जनसंवाद यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. शरद पवार यांनी पारनेरपासूनच नगर जिल्ह्यातील प्रचाराचा नारळ फोडला. आपण तालुक्यातील विकासाचे प्रश्न सोडविले, असे औटी सांगत आहेत. तर औटी हे जनतेशी संवाद साधत नाहीत, अपमानित करतात. असे मुद्दे लंके प्रचार सभांमधून मांडत आहेत. लंकेंसाठी युवकांची एकजूट निलेश लंके यांच्यासाठी बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, महानगर बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, उपसभापती दीपक पवार, मधुकर उचाळे, बाबाजी तरटे, बबलू रोहोकले, विक्रमसिंह कळमकर, अशोक सावंत, प्रभाकर कवाद यांच्याबरोबरच नगर तालुक्यातील दादा पाटील शेळके, प्रताप शेळके, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे सक्रीय आहेत. माजी आमदार दादाभाऊ कळमकर हेही प्रचारात आहेत. माजी आमदार नंदकुमार झावरे यांचीही लंके यांनी भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले. राहुल झावरे हेही औटी यांच्यापासून दुरावले असल्याने ते लंके यांच्यासोबत राहण्याची शक्यता आहे. दादा शिंदे, विजय औटी, पारनेरचे नगरसेवक नंदकुमार औटी, जवळ्याचे संदीप सालके, टाकळी ढोकेश्वरचे बापू शिर्के, दत्ता निवडुंगे, कोहोकडीचे सुदाम पवार, अरूण पवार असे समर्थक लंके यांच्याकडे आहेत. गावागावात त्यांचे आकर्षण आहे. औटी यांचा घोंगडी बैठकांवर भरऔटी यांनी उद्धव ठाकरे यांची सभा वगळता सगळीकडे घोंगडी बैठका घेत कार्यकर्त्यांची बांधणी व नियोजन केले आहे़. पंधरा वर्षात विकासाच्या माध्यमातून मतदरसंघाचा चेहरामोहरा बदलला हा त्यांच्या प्रचाराचा मुद्दा आहे. मागील निवडणुकीत बरोबर नसलेले जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, बाबासाहेब तांबे, राहुल शिंदे, भाजपात आलेले सुजित झावरे, भाजपचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे, वसंत चेडे, आझाद ठुबे, रासपचे गंगाधर कोळेकर, आरपीआयचे अमित जाधव यांच्यासह सेनेचे रामदास भोसले, गणेश शेळके, दत्तात्रय कुलट, निलेश खोडदे आदींची एकजूट झाली आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019