बेलापूर बदगी लघुप्रकल्प भरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 04:08 PM2020-08-22T16:08:29+5:302020-08-22T16:09:03+5:30

दमदार मोसमी पावसाने अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी लघु प्रकल्प शुक्रवारी दुपारनंतर पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. यामुळे  या धरणाखालील कोटमारा धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. 

Belapur Badgi small project filled | बेलापूर बदगी लघुप्रकल्प भरला

बेलापूर बदगी लघुप्रकल्प भरला

googlenewsNext

बोटा :  दमदार मोसमी पावसाने अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी लघु प्रकल्प शुक्रवारी दुपारनंतर पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. यामुळे  या धरणाखालील कोटमारा धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. 

  कच नदी ब्राम्हणवाडा परिसरात उगम पावते या पाणलोट क्षेत्रातही मोसमी पावसाचे प्रमाण कमी होते. लांबलेला या मोसमी पावसाने नुकतीच दमदार हजेरी लावल्याने तेथील या नदीवरील बंधारे भरून वाहू लागल्याने पाण्याची आवक बेलापूर बदगी लघु प्रकल्प होऊ लागली. 

  दरम्यान, अखेर शुक्रवारी दुपारनंतर हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. रात्री सांडव्यावरून पाणी भरून वाहू लागले आहे. या पाण्याची आवक कुरकुटवाडी आंबीदुमाला परिसरातील कोटमारा धरणात होऊ लागली आहे. यामुळे हे धरणही भरणार असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.  
 

Web Title: Belapur Badgi small project filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.