चाचणीचा अहवाल नसल्यास होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:20 AM2021-05-24T04:20:45+5:302021-05-24T04:20:45+5:30

अहमदनगर : महापालिकेने परवानगी दिलेल्या आस्थापनांमध्ये काम करणाऱ्यांनी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करून अहवालसोबत ठेवावा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा ...

Action will be taken if there is no test report | चाचणीचा अहवाल नसल्यास होणार कारवाई

चाचणीचा अहवाल नसल्यास होणार कारवाई

Next

अहमदनगर : महापालिकेने परवानगी दिलेल्या आस्थापनांमध्ये काम करणाऱ्यांनी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करून अहवालसोबत ठेवावा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त शंकर गोरे यांनी दिला आहे.

आयुक्त गोरे म्हणाले, की महानगरपालिका क्षेत्रात मेडिकल, दुग्धजन्य पदार्थांची विक्रीची दुकाने, कृषी सेवा केंद्र, औषधांची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. या आस्थापनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाचणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही चाचणी करण्यासाठी २५ मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत दुकानांचे मालक, कर्मचाऱ्यांनी मनपाच्या आराेग्य केंद्रात जाऊन आरटीपीसीआर चाचणी करू घ्यावी. चाचणीचा अहवाल सोबत ठेवावा. आरटीपीसीआर चाचणीसाठी सहायक आयुक्त संतोष लांडगे यांच्याशी संपर्क साधावा, असे महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. चौकाचौकांत, तसेच संपूर्ण प्रभागात परवानगी नसताना भाजीपाला विक्रेते, फळे विक्रेते आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे दक्षता पथकाचे प्रमुख शशिकांत नजान यांनी सांगितले.

Web Title: Action will be taken if there is no test report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.