शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूर तालुक्यातील झेडपी शाळा झाल्या डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST

श्रीरामपूर : जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या शाळांतील मुलांना बालभारतीने विकसित केलेला अभ्यासक्रम लाइव्ह पाहता यावा यासाठी शाळांना ‘एलएफडी’ मॉनिटर ...

श्रीरामपूर : जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या शाळांतील मुलांना बालभारतीने विकसित केलेला अभ्यासक्रम लाइव्ह पाहता यावा यासाठी शाळांना ‘एलएफडी’ मॉनिटर देत सर्व सरकारी शाळा डिजिटल करण्याचा प्रकल्प आमदार लहू कानडे यांनी हाती घेतला आहे. अडीच कोटी रुपये खर्च करून १६८ शाळांत ही व्यवस्था करण्यात आली आहे.

शाळांना त्यांच्या पटसंख्येप्रमाणे हे एलएफडी संच देण्यात आले आहेत. मुलांना सर्व विषयांचा अभ्यासक्रम समजावून सांगण्यासाठी बालभारतीने डिजिटल अभ्यासक्रम बनविला आहे. या अभ्यासक्रमामुळे मुलांना आकलन होणे सुलभ जाते. बालभारतीचा हा अभ्यासक्रम एकतर इंंटरनेटच्या आधारे संगणकावर अथवा मोबाइलवर पहावा लागतो. बऱ्याच शाळांमध्ये ही सुविधा नसते. त्यासाठी कानडे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून शाळांना एलएफडी मॉनिटर देण्याचा निर्णय घेतला. या मॉनिटरच्या आधारे टीव्हीप्रमाणे मुलांना वर्गात बालभारतीचे डिजिटल व्हिडिओ पाहता येतील.

श्रीरामपूर मतदारसंघात श्रीरामपूर तालुका व राहुरी तालुक्यातील ३२ गावे समाविष्ट आहेत. हे दोन्ही तालुके मिळून १६८ शाळांत हे संच बसवले आहेत. एकूण ३२० मॉनिटर बसविण्यात आले आहेत. काही शाळांत पटसंख्या अधिक असल्याने तेथे एकापेक्षा अधिक माॅनिटर देण्यात आले. सुमारे १४ हजार मुलांना या तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. विधानसभा मतदारसंघातील सर्व शाळा एकाच वेळी डिजिटल करण्याचा प्रयोग एखाद्या लोकप्रतिनिधीने बहुधा प्रथमच केल्याचा दावा केला जात आहे.

.............

काय आहे हे तंत्रज्ञान?

एलएफडी अर्थात ‘लार्ज फॉरमॅट डिस्प्ले’ हा एक टीव्हीसारखा मॉनिटर आहे. यावर केवळ बालभारतीचे विकसित केलेल्या सॉफ्टवेअरमधील व्हिडिओ मुलांना पाहता येतात. इंटरनेरशिवाय हे व्हिडिओ पाहता येतील. त्यामुळे मुलांना या व्हिडिओच्या माध्यमातून धडे, कविता, अंकगणित, इंग्रजी या सर्व विषयांतील धडे लाइव्ह दाखविता येतात. मुलांना यात बहुपर्यायी प्रश्नही सोडविता येतात. पहिली ते सातवीपर्यंतचा अभ्यासक्रम यात आहे. एलएफडी मॉनिटरचा वापर कसा करावा, यासाठीचे प्रशिक्षणही शिक्षकांना दिले जात आहे.

------

मी स्वत: शिक्षक राहिलो आहे. बालभारतीवरही काम केलेले आहे. त्यामुळे अध्यापन प्रक्रिया सुलभ व विद्यार्थिकेंद्रित व्हावी असा माझा प्रयत्न आहे. गृहपाठाअभावी विद्यार्थी कमी पडतात. त्यामुळे सरकारी शाळांना बळकट करण्यासाठी हा तंत्रस्नेही उपक्रम राबविला जात आहे. मतदारसंघातील सर्व शाळा डिजिटल करण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.

लहू कानडे, आमदार