जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीस साडेसहा कोटींचा नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST2021-06-10T04:15:53+5:302021-06-10T04:15:53+5:30

अध्यक्ष जोर्वेकर यांनी सांगितले की, संस्थेस मागील आर्थिक वर्षात ६ कोटी ४९ लाखांचा ढोबळ नफा झाला आहे. वार्षिक सभेत ...

Zilla Parishad Employees Society Profit of Rs | जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीस साडेसहा कोटींचा नफा

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीस साडेसहा कोटींचा नफा

अध्यक्ष जोर्वेकर यांनी सांगितले की, संस्थेस मागील आर्थिक वर्षात ६ कोटी ४९ लाखांचा ढोबळ नफा झाला आहे. वार्षिक सभेत संचालक मंडळाने सभासदांच्या ३१ मार्च २०२०च्या शेअर्सवर १० टक्के लाभांशाची शिफारस केली असून, कायम निधीवरील व्याज ९ टक्के करण्याचा विषय आहे. सभासदाची सर्वसाधारण कर्जमर्यादा १३ लाखांवरून १५ लाख, तातडी कर्जमर्यादा २५ वरून ३० हजार रुपये असे अनेक विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत.

उपाध्यक्ष प्रताप गांगर्डे यांनी सांगितले की, मार्च २०२० अखेर सभासद संख्या २९३१ असून, संस्थेचे वसूल भागभांडवल २१.९३ कोटी, फंड्स १४.४६ कोटी, ठेवी ११४.७० कोटी, सभासदांना कर्जवाटप १११.६७ कोटी रुपये आहेत. यावेळी संस्थेचे संचालक संजय कडूस, भरत घुगे, सोपान हरदास, संतोष नलगे, संजू चौधरी, अरुण शिरसाठ, विलास वाघ, ज्ञानदेव जवणे, हरी शेळके, मोहन जायभाये, वालचंद ढवळे, सुभाष कराळे, नारायण बोराडे, इंदु गोडसे, उषा देशमुख, अशोक काळापहाड, शशिकांत रासकर, विलास शेळके, कैलास डावरे, बाबासाहेब पंडित, शेषराव शेळके, व्यवस्थापक राजेंद्र पवार, उपव्यवस्थापक प्रशांत लोखंडे आदी उपस्थित होते.

Web Title: Zilla Parishad Employees Society Profit of Rs