शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
3
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
4
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
5
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
6
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
7
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
8
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
9
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
10
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
11
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
12
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
13
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
14
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
15
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
16
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
17
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
18
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
19
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी श्रमदानातून केली रस्त्याची दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST

नगर तालुक्यातील शेंडी फाटा ते वांबोरी हा रस्ता परिसरातील दहा-बारा गावांसाठी जवळचा रस्ता आहे. या रस्त्यावर पिंपळगाव तलावाचा दगडी ...

नगर तालुक्यातील शेंडी फाटा ते वांबोरी हा रस्ता परिसरातील दहा-बारा गावांसाठी जवळचा रस्ता आहे. या रस्त्यावर पिंपळगाव तलावाचा दगडी सांडवा असून, शंभर वर्षे झाल्यामुळे याची दुरवस्था झाली आहे; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. पावसाच्या पाण्यात खड्डे न दिसल्यामुळे येथे दररोज अपघात होतात. त्यामुळे पिंपळगाव माळवी येथील काही युवकांनी एकत्र येत स्वखर्चाने व श्रमदानातून या खड्ड्यांमध्ये सिमेंट काँक्रीट भरून रस्ता दुरुस्त केला. या श्रमदानासाठी पिंपळगाव माळवीचे ग्रामपंचायत सदस्य सुधीर गायकवाड, विराज गायकवाड, डॉ. किरण गायकवाड, सतीश बनकर व शुभम बोरा यांनी पुढाकार घेतला. गावातील युवक प्रवीण भालके, सुभाष बारगळ, अभिजित झिने, संदीप पवार, संकेत शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, अजय बर्डे, शुभम झिने, सुशांत शिंदे, प्रशांत शिंदे आदींनी श्रमदान केले.

----------

फोटो - २८ पिंपळगाव माळवी सफाई

पिंपळगाव माळवी येथील युवकांनी स्वखर्चातून व श्रमदानातून नगर-वांबोरी रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती केली.

280721\img_20210728_092939.jpg

नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील युवकांनी तलावाचा सांडवाची स्वखर्चाने श्रमदानातून दुरुस्ती केली