पुणतांबा येथील तरुणाची डोणगावात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:28 IST2020-12-30T04:28:29+5:302020-12-30T04:28:29+5:30

पुणतांबा : राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील तरुणाने वैजापूर तालुक्यातील डोणगाव येथील शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा ...

Young man from Puntamba commits suicide in Dongaon | पुणतांबा येथील तरुणाची डोणगावात आत्महत्या

पुणतांबा येथील तरुणाची डोणगावात आत्महत्या

पुणतांबा : राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील तरुणाने वैजापूर तालुक्यातील डोणगाव येथील शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघड झाला.

राम वसंत भालेराव (वय ३५, रा. पुणतांबा), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

वीरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक बी. एल. धनुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणतांबा येथील राम भालेराव यांनी वैजापूर तालुक्यातील डोणगाव शिवारातील गट नंबर ५६/५७ मधील धनंजय भाऊसाहेब धोर्डे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. धनंजय धोर्डे आपल्या शेतात चक्कर मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी वैजापूर तालुक्यातील वीरगाव पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलीस नाईक बी. एल. धनुरे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. राम भालेराव यांच्या मागे पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Young man from Puntamba commits suicide in Dongaon