शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

येळकोट ऽ येळकोट ऽ जयमल्हार !

By admin | Updated: December 17, 2015 23:40 IST

पारनेर : पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबा मंदिरानजीक उभारण्यात आलेल्या खंडोबा व म्हाळसाच्या पितळी मूर्तीचा प्रतिष्ठापना व सुवर्णकलशारोहण सोहळा पार पडला.

पारनेर : राज्यभरातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबा मंदिरानजीक उभारण्यात आलेल्या खंडोबा व म्हाळसाच्या पितळी मूर्तीचा प्रतिष्ठापना व सुवर्णकलशारोहण सोहळा गुरुवारी हजारो भाविकांच्या मांदियाळीत व जगदगुरू शंकराचार्य व महंत फलाहारी महाराज यांच्या हस्ते पार पडला. पारनेर तालुक्यातील क्षेत्र कोरठण खंडोबा राज्यभरातील लाखो भाविकांचे कुलदैवत आहे. गुरूवारी चंपाषष्टी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे खंडोबाच्या मंगलस्नानाने महोत्सवास सुरवात झाली. त्यानंतर सकाळी सहा वाजता खंडोबाची पूजा व आरती झाली. आठ वाजता गोरेगाव ग्रामस्थांच्या दिंडी सोहळ्याचे आगमन देवस्थाननजीक झाल्यावर देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड यांनी दिंडीचे स्वागत केले. त्यानंतर देवस्थान व भाविकांच्या वर्गणीतून तयार करण्यात आलेल्या खंडोबा -म्हाळसा यांच्या पितळी मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना व सुवर्ण कलशारोहण सोहळा करवीरपीठाचे शंकराचार्य व मथुरा वृंदावन येथील फलाहारी महाराज यांच्या हस्ते पार पडला. शंकराचार्य म्हणाले, धार्मिक आचरणातून सुसंस्कारित समाज घडविण्याची जबाबदारी आता संत, महंतांवर आली असून यामधूनच अध्यात्म व आत्मसन्मान जोडले जाणार आहे. त्यानंतर रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन झाले. उत्सवमूर्तीची चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढून मंदिर प्रदक्षिणा करण्यात आली. नंतर महंत फलाहारी महाराज यांनी आशीर्वचन दिले. ते म्हणाले, चंपाषष्ठी महोत्सवाला विशेष महत्व असून यातून कोरठण खंडोबाच्या भूमीत एक धार्मिक अधिष्ठान तयार झाले आहे. यावेळी तहसीलदार भारती सागरे, पारनेर तालुका सामाजिक विचार मंचचे अध्यक्ष गणेश कावरे, सुनील कावरे, देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.पांडुरंग गायकवाड, रामदास मुळे, राहुल पुंडे हजर होते. (तालुका प्रतिनिधी)