शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
4
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
5
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
6
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
7
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
8
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
9
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
10
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
11
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
12
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
13
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
14
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
15
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
16
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
17
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
18
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
19
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
20
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

नगर तालुक्यातील ५३ गावांचा कारभार महिलांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:36 IST

केडगाव : नगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी (दि. २८) दुपारी काढण्यात येवून आरक्षण जाहीर करण्यात आले ...

केडगाव : नगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी (दि. २८) दुपारी काढण्यात येवून आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. १०५ पैकी ५३ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिला राखीव झालेले असून या ठिकाणी महिलाराज येणार आहे तर ५२ ठिकाणी पुरुष अथवा महिला यापैकी कोणालाही सरपंचपदी संधी मिळू शकते.

नगर तालुक्यातील १०५ पैकी ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारीला झालेल्या असून ४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. त्यामुळे सन २०२० ते २०२५ या कालावधी करीता हे आरक्षण काढण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या अध्यक्षतेखाली न्यू आर्टस् महाविद्यालयात तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी सरपंच, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य यांच्या उपस्थितीत १o वर्षीय विद्यार्थी अथर्व गवळी याच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी तहसीलदार उमेश पाटील, नायक तहसीलदार अभिजित बारवकर, प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी पवार उपस्थित होेते. प्रारंभी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १६ ग्रामपंचायती आरक्षीत करण्यात आल्या. त्यात ८ महिला राखीव, त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी ३ ग्रामपंचायती त्यामध्ये २ महिला राखीव, नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी २८ त्यापैकी १४ महिला राखीव, सर्वसाधारण ५८ त्यापैकी २९ महिला राखीव अशा पद्धतीने आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

चौकट :

प्रवर्गनिहाय सरपंचपद आरक्षण

अनुसूचित जाती, महिला राखीव - बाबुर्डी घुमट, रांजणी, पारेवाडी (पारगाव), सारोळाबद्धी, पिंपळगाव माळवी, भोयरे खुर्द, गुंडेगाव, रुईछत्तीशी.

अनुसूचित जाती व्यक्ती - कर्जुने खारे, शिराढोण, दशमी गव्हाण, गुणवडी, उदरमल, घोसपुरी, खातगाव टाकळी, हमीदपूर.

अनुसूचित जमाती, महिला राखीव - धनगरवाडी, बुरुडगाव.

अनुसूचित जमाती व्यक्ती - पिंपरी घुमट.

नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला राखीव - भातोडी पारगाव, राळेगण, बाराबाभळी, कौडगाव, पिंपळगाव वाघा, कापुरवाडी, पिंपळगाव उज्जैनी, देवगाव, दरेवाडी, निमगाव वाघा, सारोळा कासार, बाबुर्डी बेंद, शेंडी, पिंपळगाव लांडगा.

नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती - माथणी - बाळेवाडी, मदडगाव, सोनेवाडी (पिंपळगाव), नवनागापूर, वडगाव तांदळी, चास, वाटेफळ, हिवरेझरे, मांडवे, अंबिलवाडी, वाळकी, टाकळी काझी, साकत खुर्द, सोनेवाडी (चास).

सर्वसाधारण महिला राखीव - डोंगरगण, वारुळवाडी, बारदरी, नारायणडोह, हिंगणगाव, नेप्ती, आठवड, दहिगाव, मजलेचिंचोली, निमगाव घाणा, जेऊर, निंबोडी, कोल्हेवाडी, टाकळी खातगाव, भोईरे पठार, वडारवाडी, रतडगाव, आगडगाव, वाकोडी, हिवरे बाजार, वडगाव गुप्ता, देहरे, उक्कडगाव, पिंपळगाव कौडा, मेहेकरी, बहिरवाडी, देऊळगाव सिद्धी, इसळक, मांजरसुंबा.

सर्वसाधारण व्यक्ती - नांदगाव, इमामपूर, अरणगाव, खंडाळा, पारगाव मौला, हातवळण, नागरदेवळे, चिचोंडी पाटील, भोरवाडी, आव्हाडवाडी, सांडवे, अकोळनेर, बुर्‍हाणनगर, पोखर्डी, खोसपुरी, पारगाव भातोडी, खांडके, पांगरमल, तांदळी वडगाव, शिंगवे, विळद, जखणगाव, वाळुंज, निंबळक, मठपिंप्री, ससेवाडी, कामरगाव, शहापूर केकती, खडकी.