वडझिरेमध्ये महिलेची गोळ्या झाडून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 23:42 IST2020-02-17T23:42:18+5:302020-02-17T23:42:52+5:30
पारनेर तालुक्यातील पारनेर-अलकुटी मार्गावर वडझिरे गावात सोमवारी रात्री पावणे

वडझिरेमध्ये महिलेची गोळ्या झाडून हत्या
पारनेर (जि. अहमदनगर) : एकाने पिस्तूलातून केलेल्या गोळीबारात सविता सुनील गायकवाड (वय 35) ही महिला ठार झाली. ही घटना पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पारनेर तालुक्यातील पारनेर-अलकुटी मार्गावर वडझिरे गावात सोमवारी रात्री पावणे दहाच्या दरम्यान एक ते दोन युवकांनी येऊन सविता गायकवाड यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. या वादात एका तरुणाने स्वतः कडील पिस्तुल काढून सविता गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. तीन गोळ्या छातीत घुसल्याने गायकवाड यांचा मृत्यू झाला. दरम्यान गायकवाड यांचा मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. त्यानंतर मोठा जमाव जमला होता. गोळीबार कोणत्या वादातून झाला याची माहिती समजली नाही.