मळणीयंत्रात साडीचा पदर अडकून महिलेचा मृत्यू, ‘या’ तालुक्यात घडली घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 16:14 IST2021-02-27T16:13:07+5:302021-02-27T16:14:58+5:30
जामखेड तालुक्यातील साकत ग्रामपंचायती अंतर्गत कोल्हेवाडी येथील सिंधुबाई बजरंग कोल्हे ( वय ४२) या शेतकरी महिलेचे मळणी यंत्रात अडकून जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २६) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

मळणीयंत्रात साडीचा पदर अडकून महिलेचा मृत्यू, ‘या’ तालुक्यात घडली घटना
जामखेड : तालुक्यातील साकत ग्रामपंचायती अंतर्गत कोल्हेवाडी येथील सिंधुबाई बजरंग कोल्हे ( वय ४२) या शेतकरी महिलेचे मळणी यंत्रात अडकून जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २६) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
कोल्हेवाडी येथे बजरंग कोल्हे यांच्या शेतात ज्वारीचे खळे सुरू होते. कुटुंबातील लोक मळणी यंत्रावर काम करत होते. खळे संपत आले असताना मळणी यंत्राखाली पडलेले भुसकट काढण्यासाठी सिंधुबाई कोल्हे या वाकून भुसकट काढत होत्या. त्यावेळी ट्रॅक्टर व मळणी यंत्र ज्या ठिकाणी जोडले जाते तेथे सिंधुबाई यांच्या साडीचा पदर अडकला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.