शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याची रक्कम आमच्या मृत्यूनंतर मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST

शेवगाव : मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामातील मंजूर झालेली पीक विम्याची रक्कम आमच्या मृत्यूनंतर मिळणार का, असा संतप्त ...

शेवगाव : मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामातील मंजूर झालेली पीक विम्याची रक्कम आमच्या मृत्यूनंतर मिळणार का, असा संतप्त सवाल शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी येथील तहसील कार्यालयात केला. ही रक्कम तत्काळ खात्यात जमा करावी. अन्यथा, प्रांताधिकारी कार्यालयावर पायी दिंडी काढून संताप व्यक्त करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. या मागणीचे निवेदन गुरुवारी सकाळी शेतकऱ्यांसह जनशक्ती आघाडीच्या वतीने नायब तहसीलदार मयूर बेरड यांना देण्यात आले.

यावेळी जनशक्तीचे उपाध्यक्ष संजय आंधळे, राम पोटफोडे, सुरेश चौधरी, किशोर दहिफळे, नवनाथ खेडकर, गोरक्ष चेमटे, शिवाजी लांडे, जगन्नाथ गावडे, आजिनाथ कातकडे, विष्णू दिवटे, देवदान अल्हाट, म्हतारदेव आव्हाड, राजेंद्र खेडकर, अनिल नागरगोजे, दिनकर ढाकणे, विष्णू निजवे, तुळशीराम रुईकर, शिवाजी औटी, सुरेश टेकाळे, भाऊसाहेब मासाळ, हरिश्‍चंद्र आव्हाड, भारत भालेराव, भिवसेन केदार, रघुनाथ घोरपडे, हरिश्चंद्र निजवे आदी उपस्थित होते.

२०२०-२१ या वर्षात शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी हंगामातील पीक विमा भरला होता. मागील वर्षी अतिरिक्त पावसामुळे दोन्ही हंगामातील पिके वाया गेली होती. यामध्ये कापूस, तूर, मूग, बाजरी, सोयाबीन, गहू, हरभरा आदी हंगामातील पिकांचा समावेश आहे. सर्व पिके अतिरिक्त पावसामुळे व वेळेला ताण मिळाल्यामुळे नष्ट झाली होती. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पदरामधे पेरणीचा खर्चदेखील पडला नाही. लाखोंचा खर्च करूनही काहीच न मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष शिवाजी काकडे, जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे, यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.

----

शेजारच्या जिल्ह्याला लाभ आपल्याला का नाही?

शेजारील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभही मिळालेला आहे. परंतु, या परिसरातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. दहा दिवसांच्या आत विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अदा करावी. अन्यथा, दहा दिवसानंतर शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील शेतकरी या मागणीच्या पूर्ततेसाठी जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने अमरापूर ते पाथर्डी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर पायी दिंडी काढून संताप व्यक्त करतील, असे निवेदनात म्हटले आहे.

----

२२ शेवगाव निवेदन

शेवगाव येथे पीक विम्याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी स्वीकारले.

220721\1551-img-20210722-wa0018.jpg

खरिप व रब्बी हंगामातील गत वर्षीचा मंजूर झालेला पीक विमा रक्कम तात्काळ खात्यावर वर्ग करावी या मागणीचे निवेदन देतांना जनशक्ती आघाडीचे पदाधिकारी व शेतकरी.