शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

वांबोरी चारीचे पाणी लोहसरपर्यंत पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 16:15 IST

‘लोकमत’ने वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर वांबोरी चारीला पाणी सोडण्यात आले. गुरुवारी रात्री ११ वाजता तालुक्यातील लोहसर गावातील तलावात पाणी आल्याने या भागातील शेतक-यांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

करंजी : वांबोरी चारीचे पाणी पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना मिळावे यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी व शेतक-यांनी वेळवेळी आंदोलने केली. ‘लोकमत’ने वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर वांबोरी चारीला पाणी सोडण्यात आले. गुरुवारी रात्री ११ वाजता तालुक्यातील लोहसर गावातील तलावात पाणी आल्याने या भागातील शेतक-यांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.  सलग दोन वषार्पासून दुष्काळाशी सामना करता-करता या भागातील शेतक-यांचे हालहाल झाले. संत्रा, मोसंबी, डाळिंबाच्या जपलेल्या बागा या भागातील शेतक-यांच्या डोळ्यादेखत जळून गेल्या. दावणीची दुभती जनावरे सहा महिन्यापासू्न छावणीत गेली. या भागातील करंजी परिसरातील दगडवाडी, भोसे, वैजू बाभुळगाव, लोहसर, खांडगाव, जोहारवाडी, सातवड, कौडगावसह अनेक गावातील विहिरी, बोअरवेल आटून गेले. पिण्याच्या पाण्याची पावसाळ्यात तीव्र टंचाई जाणवत असून अनेक गावात टँकर चालू आहेत. या दुष्काळी भागाला पाणी मिळावे म्हणून मुळा धरणातून वांबोरी चारी योजना करण्यात आली. ही योजना पूर्ण होवून दहा वर्ष झाली तरी योजनेचे पाणी कधी या भागाला मिळाले नाही.   मागच्या वषीर्ही या भागात पाऊस झाला नाही. दुष्काळावर मात करण्यासाठी या भागाला वांबोरी चारीचे पाणी सोडावे म्हणून या भागातील नागरिकांनीतीव्र आंदोलने केली. ‘लोकमत’ने वेळोवेळी पाठपुरावा केल्याने वांबोरी चारीला पाणी सोडण्यात आले. मात्र पाणी चोरी, फूट तूट, अपूर्ण काम यामुळे या भागातील मढी, घाटसिरसच्या पुढे पाणी गेले नाही. यावर्षी पुन्हा या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने वांबोरी चारीचे आंदोलन या भागात सुरु झाले. त्यामुळे प्रशासनाने वांबोरी चारीला पाणी सोडले. तालुक्यातील लोहसर गावापर्यंत पोहोचले आहे.   वांबोरी चारीचे पाणी तालुक्यातील लोहसर गावापर्यंत पूर्ण दाबाने आले आहे. या भागातील नागरिकांच्या लढ्यामुळे व ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे चारीला पाणी आले, असे वांबोरी चारी समितीचे समन्वयक संतोष आठरे यांनी सांगितले.वांबोरी चारी पाईपलाईन योजनेव्दारे १०२ पाझर तलाव भरण्याची योजना आहे. पूर्ण क्षमतेने योजना चालू राहिल्यास या भागातील दुष्काळाची तिव्रता कमी होईल, असे सातवड गावचे उपसरपंच राजेंद्र पाठक यांनी सांगितले.  

टॅग्स :mula muthaमुळा मुठाWaterपाणी