शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवर पाणी पुरवठ्याचे नियोजन

By admin | Updated: December 16, 2015 23:09 IST

पारनेर : नगरपंचायतीच्या नळपाणीपुरवठा योजनेतून येणाऱ्या पाण्याची वेळ व तारीख मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविण्याचा अभिनव उपक्रम पारनेरमधील प्रभाग बारामध्ये सुरू होणार आहे.

पारनेर : नगरपंचायतीच्या नळपाणीपुरवठा योजनेतून येणाऱ्या पाण्याची वेळ व तारीख मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविण्याचा अभिनव उपक्रम पारनेरमधील प्रभाग बारामध्ये सुरू होणार आहे. यामुळे पाणी भरण्यासाठी व्यावसायिक, नोकरदार मंडळी व नागरिकांची धावपळ थांबणार आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असावा. पारनेर शहरात नगरपंचायतीच्यावतीने नळपाणीपुरवठा योजनेतून घरोघरी नळ जोड देऊन पाणीपुरवठा होतो. शहराला हंंगा तलाव, मनकर्णिका नदीवरील विहीर व टंचाई कालावधीत सुपा एमआयडीसी या स्त्रोतांमधून पाणी घेऊन शहरातील पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी साठवून नंतर पाणीपुरवठा केला जातो. परंतु अनेकदा हंगा तलाव किंवा मनकर्णिका भागातील पाणीउपसा होणाऱ्या ठिकाणी वीजपुरवठा दिवसभर बंद असतो किंवा पंप जळाल्याने पाणीपुरवठ्याच्या नियोजनात विस्कळीतपणा येतो. त्यामुळे पाणी सोडताना नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. तसेच अवेळी पाणी आल्याने नागरिकांची धावपळ उडते. हा त्रास वाचविण्यासाठी प्रभाग बारामधील नगरसेविका शशिकला शेरकर यांनी याबाबत उपाययोजना करण्यासाठी प्रभागातील युवक संघटनेचे प्रमुख अ‍ॅड.गणेश कावरे, प्रवीण औटी, कल्याण थोरात, सचिन बडवे, वैभव बडवे, उदय शेरकर, प्रमोद गोळे, सचिन मते व महिलांची बैठक घेतली. बैठकीत नळाला पाणी कोणत्या वेळी व कोणत्या तारखेला येणार आहे, याचे नियोजन करण्याची गरज असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. प्रभाग १२ मध्ये नागेश्वर गल्ली, पूर्णवाद परिसर, बोळकोबा गल्ली, कावरे गल्ली, सेनापती बापट स्मारक परिसर, शेरकर गल्ली, सेनापती बापट रस्ता हा परिसर येतो. यामध्ये पाणी सोडण्याचा कोणता भाग येतो, त्यानुसार नियोजन करावे व संबंधित भागातील नागरिकांना त्याचा संदेश मोबाईलवर देण्यात यावा, असे बैठकीत ठरविण्यात आले. दोन ते तीन आठवड्यात या अभिनव उपक्रमाचे पारनेर नगरपंचायतीत सादरीकरण होईल. (तालुका प्रतिनिधी)