शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
3
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
4
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
5
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
6
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
7
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
8
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
9
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
10
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
11
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
12
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
13
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
14
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
15
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
16
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
17
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
18
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
19
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
20
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
Daily Top 2Weekly Top 5

भंडारदरा धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

दीर्घकाळाच्या विश्रांतीनंतर भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रविवारपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. सोमवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत ...

दीर्घकाळाच्या विश्रांतीनंतर भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रविवारपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. सोमवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत या मोसमात प्रथमच घाटघर येथे आठ इंच पावसाची नोंद झाली होती. यानंतरही पावसाची संततधार सुरूच आहे. बुधवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत रतनवाडी येथे सहा इंचाहून अधिक १५५ मिमी. पावसाची नोंद झाली, तर पांजरे येथे १२२ मिमी. पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल घाटघर येथे १२२ मिमी आणि भंडारदरा येथे ११७ मिमी. पाऊस कोसळला.

परिसरातील ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आणि भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवकही वाढली. बुधवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत भंडारदरा धरणात ४११ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक होत पाणीसाठा ५,४५९ दशलक्ष घनफूट झाला. पावसाळा सुरू होण्यापूर्वी धरणात असलेल्या मुबलक पाणी साठ्यामुळे धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला. निळवंडे धरणात १०० दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक होत पाणीसाठा १ हजार ६०० दशलक्ष घनफूट इतका झाला होता.

................

मुळाच्या प्रवाहात वाढ

मुळा खोऱ्यातही रविवारी सायंकाळपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. या भागातही मुळा नदीच्या प्रवाहात वाढ झाली असून, बुधवारी सकाळी कोतुळजवळील मुळा नदीचा विसर्ग ५ हजार ८२६ क्युसेक इतका होता.

..............

कोथळे तलाव ओव्हरफ्लो

हरिश्चंद्रगडाच्या पर्वत रांगांतही रविवारपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे या परिसरातील ओढे, नालेही दुथडी भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे मुळा खोऱ्यातील आंबितनंतरचा कोथळे येथील १८२ दशलक्ष घनफूट क्षमतेचा लघु पाटबंधारे तलाव मंगळवारी रात्री भरून वाहू लागला. त्यातील पाणी आता मुळा पात्रात झेपावू लागले आहे.