शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

जलस्त्रोत आटले

By admin | Updated: August 1, 2014 00:22 IST

शेवगाव : पावसाळ्याचा तब्बल पावणेदोन महिन्याचा मोठा कालावधी उलटूनही तालुक्यात अजुनही पावसाचे प्रमाण जेमतेम आहे. त्यामुळे पाण्याचे सर्व स्त्रोत आटले असून पाणी टंचाईच्या झळा वाढत आहेत.

शेवगाव : पावसाळ्याचा तब्बल पावणेदोन महिन्याचा मोठा कालावधी उलटूनही तालुक्यात अजुनही पावसाचे प्रमाण जेमतेम आहे. त्यामुळे पाण्याचे सर्व स्त्रोत आटले असून पाणी टंचाईच्या झळा वाढत आहेत.शेवगाव तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान सहाशे मि.मी. आहे. यंदा जुलै महिना संपला तरी पावसाला सुरुवात नसल्याने चिंतेचे वातावरण आहे. तालुक्यात आतापर्यंत १२० मि. मी. पावसाची नोंद झालेली असलीतरी हा पाऊस सलग झालेला नाही. अद्याप एकही मोठा पाऊस झालेला नाही. भीज पध्दतीचा केवळ सलाईन पाऊस चालू आहे. पावसाला जोर नसल्याने खरीप पेरण्या रखडल्या आहेत. चापडगाव, सोनेसांगवी, ढोरजळगाव, निंबेनांदूर, वडुले, वाघोली, आव्हाणे, सामनगाव, बोधेगाव, बालमटाकळी परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. अनेक भागात तर अजुनही उन्हाळा मोडलेला नाही. तालुक्यातील २५ गावे व ९४ वाड्या,वस्त्यांना सध्या २५ टँकर ७१५ खेपांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु आहे. आव्हाणे बुद्रुक, प्रभूवाडगाव, खामपिंपरी जुनी, शेकटे खुर्द, गोळेगाव, सुकळी या तहानलेल्या गावांना तसेच नजीकच्या वाड्या-वस्त्यांसाठी टँकरची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)दुष्काळाच्या मागणीसाठी रास्ता रोकोशेवगाव : शेवगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा तसेच इतर प्रमुख मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुतीच्यावतीने गुरुवारी येथील क्रांती चौकात तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जनावरांना दावणीला त्वरीत चारा द्यावा, मागेल त्या वाडी व वस्तीवर पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे, पाण्याच्या टँकरमध्ये नियमितता ठेवावी, २०१२-१३ या वर्षातील हरभरा विमा शेतकऱ्यांना त्वरीत देण्यात यावा, सन २०१२-१३ च्या हेक्टरी अनुदानातून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ंआंदोलनस्थळी आयोजित सभेत भाजपाचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, अ‍ॅड.शिवाजीराव काकडे, अरुण मुंढे, कचरू चोथे यांची भाषणे झाली. शेवगाव ताल्रुक्यात गेल्यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यंदाही दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही मोठा पाऊस नसल्याने मोठी टंचाईस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी पिण्याच्या पाण्याबरोबर चारा टंचाई मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे, असे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. आंदोलनात भाजपाचे अनिल म्हस्के, गणेश कराड, सुरेश चौधरी, मंगेश पाखरे, दिगंबर काथवटे, गंगा खेडकर, शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. शेवगावचे तहसीलदार हरिष सोनार यांना मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनामुळे शेवगावमधील वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक विस्कळीतमुळे प्रवासी, नागरिकांचे मोठे हाल झाले. पाणी योजना अडचणीतशेवगाव तालुक्यात पाणी पातळी तब्बल साडेचार मीटरने खाली गेल्याने पाणी टंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवत आहे. तालुक्याची जीवनरेखा असलेल्या जायकवाडी धरणात सध्या केवळ दोन टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शेवगाव-पाथर्डीसह ५४ गावे, शहरटाकळीसह २७ गावे, बोधेगावसह आठ तसेच हातगावसह २५ गावांच्या प्रादेशिक नळयोजना पुरवठा योजनेचे भवितव्य धोक्यात आहे. जायकवाडी जलाशयात नव्याने पाणी न आल्यास आॅगस्टच्या महिनाअखेरीस तालुक्यातील चारही प्रमुख प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.हातपंपांचे प्रस्ताव तालुक्यातील २५ गावे व ९४ वाड्या, वस्त्यांना २५ टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरु आहे. टंचाई निधीतून हाती घेण्यात आलेल्या १९ हातपंपाच्या प्रस्तावांपैकी सर्वेक्षणात सतरा हातपंपांचे प्रस्ताव अयोग्य तर पवारवस्ती, दहिगाव-ने, हनुमानवस्ती, सालवडगाव असे केवळ दोन प्रस्ताव योग्य ठरल्याने केवळ दोन हातपंपांचे काम प्रगतीपथावर आहे. तालुक्यातील पाऊस शेवगाव तालुक्यात आजअखेर झालेला पाऊस -(आकडे मि.मी. मध्ये) शेवगाव १२०, भातकुडगाव- १०५, बोधेगाव - ८९, चापडगाव- ५१, एरंडगाव- १७, ढोरजळगाव- ४४.