शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

११० गावांमध्ये पाणी टंचाई

By admin | Updated: November 15, 2014 23:38 IST

पारनेर : तालुक्यात पुढील महिन्यात पाणी टंचाई अधिक जाणवणार असून जानेवारीपर्यंत सुमारे एकशे दहा गावांमध्ये टँकरची गरज भासणार आहे. यातून तालुक्यातील दुष्काळाची भीषणता समोर आली आहे.

पारनेर : तालुक्यात पुढील महिन्यात पाणी टंचाई अधिक जाणवणार असून जानेवारीपर्यंत सुमारे एकशे दहा गावांमध्ये टँकरची गरज भासणार आहे. यातून तालुक्यातील दुष्काळाची भीषणता समोर आली आहे.पारनेर तालुक्यावर सध्या दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे आगामी काळात लोकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा व हाताला काम मिळाले पाहिजे याचा नियोजन आराखडा करण्यासाठी आमदार विजय औटी यांनी शनिवारी पारनेर येथे तलाठी, ग्रामसेवक, सर्व विभागांचे अधिकारी यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठक घेतली. यावेळी औटी यांनी गावनिहाय पाणी परिस्थिती, कधी टँकर लागेल, चाऱ्याची उपलब्धता, गावामध्ये रोजगार हमी योजनेची कोणती कामे शिल्लक आहेत व सध्या मजुरांची कुठे मागणी आहे याचा आढावा घेतला.घाणेगाव व पारनेरजवळील वाड्या-वस्त्यां रांजणगाव मशीद येथे सध्याच टँकरची गरज असल्याचे तलाठी व ग्रामसेवकांनी सांगितले. टँकरचे प्रस्ताव लवकर देण्याच्या सुचना करण्यात आल्या. वासुंदे, रूई छत्रपती,हिवरे कोरडा, गांजीभोयरे, पाडळीतर्फे कान्हूरसह काही गावांमध्ये डिसेंबरमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल, अशी माहिती देण्यात आली.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता एस.एस.मुळे यांनी तालुक्यात जून अखेर सुमारे शंभरच्याहून अधिक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावे लागेल असे नियोजन केल्याचे सांगितले. यामध्ये चिंचोली, काकणेवाडी, पळशी, पानोली या गावांमध्ये मजुरांकडून कामाची मागणी असल्याचे ग्रामसेवक व तलाठ्यांनी सांगितले. येथे सोमवारपासूनच काम सुरू करण्याचे आदेश आ. औटी यांनी दिले.पारनेर शहर व वाड्या-वस्त्यांसह तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार होता. तलाठ्याला पारनेर स्वतंत्रपणे देण्यात आले. आमदारांच्या सुचनेवरून तहसीलदार दत्तात्रय भावले यांनी त्यांना जागेवरच नेमणुकीचे पत्र दिले. पिंपळनेर येथील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीशेजारील रोहित्रावर अतिरिक्त विजेचा भार असल्याने त्याची क्षमता वाढविण्याची मागणी सरपंच आर.बी.रासकर यांनी केली. रोहित्राची क्षमता वाढविण्याविषयीच्या सूचना आ. औटी यांनी ‘महावितरण’ ला केली. लोणी हवेलीचे ग्रामसेवक व तलाठी हे दोन्हीही बैठकांना गैरहजर असल्याने तेथील गावाचा आढावाच घेता आला नाही. यावेळी सभापती गणेश शेळके, रामदास भोसले, गटविकास अधिकारी किरण महाजन आदी हजर होते. (तालुका प्रतिनिधी)