शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

साईनगरीतून भिक्षेकरी हटवण्यासाठी उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST

भिक्षेकरी प्रकरणी नगरपंचायतविरोधात राष्ट्रवादी-शिवसेना आक्रमक लोकमत न्यूज नेटवर्क शिर्डी : भाविकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी वारंवार मागणी करूनही भिक्षेकऱ्यांना ...

भिक्षेकरी प्रकरणी नगरपंचायतविरोधात राष्ट्रवादी-शिवसेना आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्क

शिर्डी : भाविकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी वारंवार मागणी करूनही भिक्षेकऱ्यांना पाठीशी घालणारी शिर्डी नगरपंचायत भिक्षेकऱ्यांची आश्रयदाती आहे का? असा सवाल शिवसेना व राष्ट्रवादीच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. भिक्षेकऱ्यांवर कारवाई न केल्यास येत्या गुरुवारी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात उपोषण करण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

शिर्डीत मोठ्या प्रमाणावर भिक्षेकरी असून, त्यात व्यसनी, गुन्हेगारी प्रवृत्तीचेही लोक आहेत. या भिक्षेकऱ्यांना पकडून साईसंस्थानच्या इमारतीत त्यांना वैद्यकीय, भोजन, निवास व्यवस्था पुरविण्याबाबत संस्थानचे सीईओ, पोलीस निरीक्षक, नगरपंचायत मुख्याधिकारी व ग्रामस्थांच्या संयुक्त बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. पोलिसांनी विसापूर भिक्षेकरी गृहाकडे चौकशी केली असता तेथे १६० जागा रिक्त असल्याचे त्यांनी कळवले होते. हे दोन्ही पर्याय असतांना नगरपंचायत भिक्षेकऱ्यांकडे दुर्लक्ष करून त्यांची पाठराखणच करत आहे. यामागे काय गौडबंगाल आहे? असा सवाल निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. सध्या कळस दर्शन व मुखदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भिक्षेकऱ्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. नगरपंचायत या विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ गुरुवार, दि. २३ जुलै रोजी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात उपोषणास बसण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील निवेदन मुख्याधिकारी, संस्थान सीईओ व पोलीस उपअधीक्षकांना देण्यात आले.

निवेदनावर शिवसेनेचे कमलाकर कोते, तालुकाध्यक्ष संजय शिंदे, शहर प्रमुख सचिन कोते, राहुल गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सुधाकर शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष रमेशराव गोंदकर, शहराध्यक्ष महेंद्र शेळके, माजी उपनगराध्यक्ष नीलेश कोते, तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, माजी जिल्हाध्यक्ष अमित शेळके आदींची नावे आहेत.

................

भिक्षेकऱ्यांवर कारवाईचे अधिकार पोलिसांना आहेत. नगरपंचायत त्यांना मदत करत आहे. नगरपंचायतची भूमिका समजावून सांगणे आहे. निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्धीसाठी विरोधकांचा फार्स आहे.

-शिवाजी गोंदकर, नगराध्यक्ष