वांबोरी पाईपचारी फोडली, अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 17:40 IST2021-02-27T17:39:55+5:302021-02-27T17:40:48+5:30

करडवाडी ( ता.पाथर्डी ) शिवारात वांबोरी पाईप चारीची मुख्य पाईपलाईन सोमवारी रात्री फोडली गेली. त्यामुळे तिसगाव पाझर तलावात सुरु असलेला पाणीपुरवठा खंडित झाला. याप्रकरणी शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Wambori piper burst near Kardwadi, police report crime against unknown person | वांबोरी पाईपचारी फोडली, अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हा

वांबोरी पाईपचारी फोडली, अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हा

तिसगाव : करडवाडी ( ता.पाथर्डी ) शिवारात वांबोरी पाईप चारीची मुख्य पाईपलाईन सोमवारी रात्री फोडली गेली. त्यामुळे तिसगाव पाझर तलावात सुरु असलेला पाणीपुरवठा खंडित झाला. याप्रकरणी शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

    ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या आदेशाने पाईपचारीला गत सप्ताहात पाणी सुरु झाले. चार दिवसांतच ते शिरापूरच्या अंतिम भागांत पोहोचले. सोमवारी मध्यरात्री मात्र अज्ञात व्यक्तींने करडवाडी शिवारात पाईपलाईन फोडली. त्यामुळे पुन्हा व्यत्यय आला आहे. कालवा निरीक्षक पांडुरंग आरगडे, बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर शाखा अभियंता आंधळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत, 

Web Title: Wambori piper burst near Kardwadi, police report crime against unknown person