शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

विडी कामगारांनी अडविले पालकमंत्र्यांचे वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 23:22 IST

अहमदनगर : पालकमंत्री राम शिंदे यांचे वाहन विडी कामगारांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात अडविले़

अहमदनगर : पालकमंत्री राम शिंदे यांचे वाहन विडी कामगारांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात अडविले़ आंदोलनकर्त्यांनी शिंदे यांना घेराव घालून कामगारांचा प्रश्न सोडविण्याची मागणी यावेळी केली़ त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण होते़ पालकमंत्री शिंदे सोमवारी नगर दौऱ्यावर आले होते़ जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी एक वाजता झालेल्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीला शिंदे यांनी हजेरी लावली़ पालकमंत्र्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होताच आंदोलनकर्त्या विडी कामगार प्रवेशद्वारावर त्यांना अडवे झाले़ पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला़ शिंदे यांनी गाडीतून उतरवून विडी कामगारांशी चर्चा केली़ यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान शहरातील विडी कामगारांना शिधापत्रिकेवर मोफत धान्य उपलब्ध करून देण्याबरोबरच विडी कामगारांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शिंदे यांनी यावेळी दिले़ विडी कारखाने गेल्या २५ दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे कामगारांचा रोजगार बुडाला आहे़ कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे़ सोलापूर येथील विडी कामगारांना शिधापत्रिकेवर मोफत धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे़ त्याप्रमाणे येथील विडी कामगारांनाही मोफत धान्य देण्याची मागणी यावेळी कामगार नेते कॉ़ शंकर न्यालपल्ली, अ‍ॅड. सुधीर टोकेकर, शंकर मंगलारप, व्यंकटेश बोगा आदींनी केली़ विडी कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद करण्यात आला़ आंदोलनात गौरव ढोणे, पियुष लुंकड, मोबीन शेख, आनंद भंडारी आदींचा समावेश होता़ (प्रतिनिधी)