शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव गुप्ता, पिंपळगाव माळवीच्या शेतकऱ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:26 IST

पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी व वडगाव गुप्ता येथील नियोजित औद्योगिक क्षेत्र विस्तारीकरणाच्या भूसंपादनास येथील बाधित शेतकऱ्यांचा ...

पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी व वडगाव गुप्ता येथील नियोजित औद्योगिक क्षेत्र विस्तारीकरणाच्या भूसंपादनास येथील बाधित शेतकऱ्यांचा मागील दहा वर्षांपासून तीव्र विरोध आहे. तरी शासनाने सातबाऱ्यावरील एमआयडीसीचा उल्लेख हटवावा या मागणीसाठी बुधवारी (दि. १८) सकाळी नगर शहरातील औद्योगिक महामंडळाच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी उपोषण केले.

येथील शेतकऱ्यांनी वेळोवेळी शासनाच्या संबंधित विभागास निवेदन देऊन त्यांच्या सातबारा उताऱ्यांवरील शासनाचे शिक्के हटविण्याची मागणी केली. परंतु, त्यांच्या या मागणीला प्रशासनाने केराची टोपली दाखविली आहे.

या परिसरातील शेतकरी अगोदरच अल्पभूधारक असून, त्यांच्या बऱ्याच शेतजमिनी एमआयडीसीमध्ये गेलेल्या आहेत. परिसरातील जमीन बागायती असल्यामुळे शेतकऱ्यांनी या भूसंपादनास विरोध केला आहे. बाधित शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर शासनाचे नाव लागल्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. कुठलीही बँक कर्ज देत नाही. त्यामुळे या मागण्यांसाठी शेतकरी बचाव कृती समितीचे प्रकाश डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केले.

या उपोषणामध्ये विजय डोंगरे, बाळासाहेब शेवाळे, रामनाथ झिने, शिवाजी डोंगरे, एकनाथ मोरे, रावसाहेब शेवाळे, परसराम गुंड, लक्ष्मण गुंड, बाळासाहेब कसबे, रामदास जाधव, नवनाथ भोसले, जालिंदर गुंड, आदी शेतकरी सहभागी झाले होते.

----

१८ वडगाव गुप्ता

पिंपळगाव माळवी, वडगाव गुप्ता येथील शेतकऱ्यांनी नगर येथील औद्योगिक महामंडळाच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.