शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

युतीचे मतदार सहलीवर

By admin | Updated: December 24, 2015 23:38 IST

अहमदनगर: दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधान परिषदेची निवडणूक चुरशीची ठरणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. लक्ष्मीदर्शनानंतर युतीचे मतदार गुरूवारी रात्री सहलीवर रवाना झाले आहेत.

अहमदनगर: दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधान परिषदेची निवडणूक चुरशीची ठरणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. लक्ष्मीदर्शनानंतर युतीचे मतदार गुरूवारी रात्री सहलीवर रवाना झाले आहेत. आघाडीने उत्तर व दक्षिणेतील मतदारांचा स्वतंत्र मेळावा शुक्रवारी आयोजित केला आहे. एकगठ्ठा मतदार असलेल्या मतदारसंघातील नेत्यांवर दबावतंत्र म्हणून प्रदेशपातळीवरील नेत्यांशी मोबाईलवर बोलने करुन दिले जात आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण जगताप व सेनेचे उमेदवार शशिकांत गाडे यांच्यात सरळ लढत होत असली तरी मच्छिंद्र सुपेकर यांची उमेदवारी कायम राहिल्याने निवडणुकीबद्दल वेगवेगळे कयास लावले जात आहेत. कॉँग्रेसचे जयंत ससाणे यांची बंडखोरी रोखण्यात राष्ट्रवादीला यश आले असले तरी कॉँग्रेसचे मतदान पारड्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीची दमछाक होत आहे. कॉँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे विधीमंडळ अधिवेशनामुळे अजूनही जिल्ह्यात सक्रिय झालेले नाहीत. 'मतदारांमध्ये वेगळा संदेश जाऊ नये, यासाठी राष्ट्रवादीने विखे-थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी व नगर येथे शुक्रवारी मेळाव्याचे आयोजन केले आहे. जयंत ससाणे यांच्यासह मधुकर पिचड, चंद्रशेखर घुले यांच्यासह आघाडीच्या प्रमुख नेत्यांना मेळाव्यांसाठी पाचारण करण्यात आले आहे. सेनेचे उमेदवार गाडे यांच्या मदतीला मुंबईतून फौजफाटा नगरमध्ये पोहचला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचा बुधवारी रात्री नगरला मुक्काम झाल्यानंतर युतीची सूत्रे वेगाने हालली. जलसंपदा मंत्री विजय शिवतारे व पालकमंत्री राम शिंदे यांनी युतीच्या मतदारांचा मेळावा घेऊन व्यूहनिती आखली. त्यानुसार युतीचे मतदार गुरूवारी रात्री सहलीवर रवाना झाले आहेत. युतीचे उमेदवार गाडे यांच्यासाठी सक्रिय झालेली यंत्रणा व नियोजन पाहता त्यामागे ‘हेड’ कोणाचे याची कुजबुज सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)उमेदवारांच्या गाठीभेटीने मतदारही संभ्रमित झाला आहे. उमेदवार अन् त्यानंतर त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफ्याच्या लाईटने रात्रीच्या अंधारात मतदारांच्या घराचा उंबरठा उजळून निघाला आहे. आघाडी उमेदवाराच्या वाहनांच्या टायरची नक्षी पुसत नाही तोच युतीच्या नेत्यांची गाडी मतदारांच्या दारात उभी राहत आहे. त्यामुळे मतदारही पेचात पडला आहे. युतीचे मतदार सहलीवर पाठवून आघाडीचे मतदार गळाला लागतात काय याची चाचपणी युतीकडून सुरू आहे. आघाडीने मात्र मतदारांवर पूर्ण विश्वास दाखवित त्यांना अजूनतरी सहलीवर पाठविलेले नाही.