निंबोडीतील घरफोडीच्या घटनांनी गावकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:26 IST2021-07-07T04:26:36+5:302021-07-07T04:26:36+5:30

तिसगाव : पाथडी तालुक्यातील निंबोडी गावासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घरफोड्या होत आहेत. यातून लाखो रुपयांचा ऐवज चोरीला ...

Villagers harassed by burglary incidents in Nimbodi | निंबोडीतील घरफोडीच्या घटनांनी गावकरी हैराण

निंबोडीतील घरफोडीच्या घटनांनी गावकरी हैराण

तिसगाव : पाथडी तालुक्यातील निंबोडी गावासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घरफोड्या होत आहेत. यातून लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून या चोऱ्यांमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. चोरांचा पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त करावा. चोऱ्या करणाऱ्या गुन्हेगारांना शोधून काढावे, अशी मागणी सरपंच मंगल म्हस्के यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून निंबोडी गावासह परिसरात सातत्याने घरफोड्यांचे प्रकार वाढले आहेत. दोन-चार दिवसाला गाव वाडीवस्तीवर चोरी झाल्याचे ऐकू येत आहे. वारंवार या गावात व परिसरात चोऱ्या होत असून नागरिकांमधून भीतीचे वातावरण आहे.

गावातील अंबादास म्हस्के, बाळासाहेब म्हस्के, रावसाहेब म्हस्के, किशोर म्हस्के, रवींद्र भापसे यांच्यासह दुर्योधन म्हस्के या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरीदेखील चोरांनी हात साफ केला आहे. त्यामुळे या झालेल्या सर्व चोऱ्यांचा पोलिसांनी तपास करावा. अन्यथा, निंबोडी फाटा येथे ग्रामस्थांसह रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा म्हस्के यांनी दिला आहे.

Web Title: Villagers harassed by burglary incidents in Nimbodi