पाचेगावात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:25 IST2021-09-06T04:25:29+5:302021-09-06T04:25:29+5:30

पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर तसेच शासनाच्या विविध योजनेची माहिती जनतेपर्यंत तत्काळ पोहोचविण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा ...

Village security system operational in Pachegaon | पाचेगावात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित

पाचेगावात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित

पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर तसेच शासनाच्या विविध योजनेची माहिती जनतेपर्यंत तत्काळ पोहोचविण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा गुरुवारी कार्यान्वित करण्यात आली.

योजनेचा प्रारंभ सरपंच संगीता कांबळे, उपसरपंच श्रीकांत पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

पाचेगावात गेल्या वर्षभरात चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ग्रामपंचायतीने ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला होता. ग्रामपंचायतीने एका मोबाईल ॲपद्वारे ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास घटनास्थळी तत्काळ मदत मिळणार आहे. तसेच शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनेची माहिती ग्रामस्थांना वेळोवेळी दिली जाणार आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणेत गावातील नागरिकांचे मोबाईल नंबर नोंदविण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले. गावासह वाडीवस्तीवरील जास्तीत जास्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे केले आहे.

Web Title: Village security system operational in Pachegaon