शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला महागला

By admin | Updated: September 4, 2024 12:10 IST

अहमदनगर : सध्या भाजीपाला बाजारात चांगलीच तेजी आहे़ पितृपंधरवाडा सुरू असल्याने पालेभाज्यांसह फळभाज्यांनाही मोठी मागणी आहे़

अहमदनगर : सध्या भाजीपाला बाजारात चांगलीच तेजी आहे़ पितृपंधरवाडा सुरू असल्याने पालेभाज्यांसह फळभाज्यांनाही मोठी मागणी आहे़ मागणीप्रमाणे बाजारात आवक होत नसल्याने भाजीपाल्याचे गेल्या पंधरा दिवसात २० ते ३० टक्यांनी दर वाढले आहेत़ पाच ते सात रुपयांना मिळणारी कोथंबिरीच्या जुडीसाठी २० ते २५ रुपये मोजावे लागत आहेत़ पितृपंधरवाड्यात मेथी, मुळा, आळू, गवार, भेंडी, कारली या भाज्यांचा पित्रजेवणात समावेश करण्यात येत असल्याने या भाज्यांना मोठी मागणी आहे़ जिल्ह्यात मध्यंतरी झालेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले़ शहरातील बाजारपेठेत जिल्ह्यातील विविध तालुक्यातून माल विक्रीला आणला जातो़ मात्र, उत्पादित माल कमी झाल्याने तालुक्याच्या बाजारपेठेतच शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला अपेक्षित दर मिळत आहे़ त्यामुळे वाहतूक खर्च टाळण्यासाठी नगरच्या बाजारपेठेत सध्या माल आणला जात नाही़ जो माल येतो तो अगदी कमी प्रमाणात आहे़ बाजारातून मात्र, भाजीपाल्याला मोठी मागणी आहे़ त्यामुळे ठोक व्यापाऱ्यांकडूनही जास्त दराने मालाची विक्री होते़ घाऊक व्यापाऱ्यांकडून ग्राहकांना माल विकताना पुन्हा नफा मिळविला जात असल्याने भाजीपाला चांगलाच कडाडला आहे़ गणपती विसर्जनानंतर पितृपंधरवाड्याला सुरुवात झाली़ दि़ २४ सप्टेंबरपर्यंत पितृपक्ष चालणार आहे़ पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी घरोघरी पितृपक्षाची परंपरा जोपासली जाते़ पितरांसाठी केल्या जाणाऱ्या भोजनात मेथी, भेंड, मुळा, आळू, गवार, कारली आदी भाज्या बनविण्याची परंपरा आहे़ त्यामुळे या भाज्यांना सध्या सगळीकडेच मोठी मागणी आहे़ मागणीप्रमाणे आवक होत नसल्याने चांगलीच दरवाढ झाली असून, दोन भाज्या घ्यावयाच्या असेल तर किमान ५० रुपयांचा खर्च होतो़ त्यामुळे गृहिणींचे बजेट बिघडले आहे़ येणाऱ्या काळातही नवरात्र व दिवाळी सण असल्याने भाजीपाल्याचा बाजार असाच तेजीत राहण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)