शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

वंदन शूरवीरांना

By admin | Updated: December 16, 2015 23:10 IST

अहमदनगर : सन १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धाचा ४४ वा विजय दिवस व या युद्धातील शहिदांना येथील आर्मर्ड कोअर सेंटर अ‍ॅण्ड स्कूलमध्ये अभिवादन करण्यात आले.

अहमदनगर : सन १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धाचा ४४ वा विजय दिवस व या युद्धातील शहिदांना येथील आर्मर्ड कोअर सेंटर अ‍ॅण्ड स्कूलमध्ये अभिवादन करण्यात आले. ‘एसीसी अ‍ॅण्ड एस’चे मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांच्यासह सेवानिवृत्त लष्करी अधिकारी व सैनिकांनी शहिदांना वंदन केले. नगरपासून ३ किमी अंतरावरील नगर-जामखेड रस्त्यावर ‘एसीसी अ‍ॅण्ड एस’चे मुख्यालय असून येथील कैवलरी युद्ध स्मारकावर बुधवारी हा सोहळा झाला. १६ डिसेंबर १९७१ या दिवशी भारतीय सैनिकांनी अथक परिश्रमाच्या बळावर बांगलादेश युद्धात पाकिस्तानवर विजय मिळवला. यात अनेक सैनिकांनी प्राणाची बाजी लावल्यानेच हा विजय सुकर झाला. सर्वप्रथम रिसालदार मेजर उदयभान, त्यानंतर निवृत्त लेफ्टनंट जनरल व्ही. के. सेवल, लेफ्टनंट जनरल एन. पोली, ‘एसीसी अ‍ॅण्ड एस’चे मेजर जनरल प्रवीण दीक्षित (विशिष्ट सेवा मेडल) यांनी वीर शहिदांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. जवानांसह उपस्थितांनीही या वीरांना नमन केले. (प्रतिनिधी) या युद्धात ‘एसीसी अ‍ॅण्ड एस’चे मोठे योगदान आहे. युद्धात एसीसीएसचे सेकंड लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल यांच्या मार्गदर्शनाखाली सैनिकांनी पश्चिम व पूर्व दिशेने कूच केले होते. आपल्या सैनिकांचे मनोधैर्य वाढवत त्यांनी शत्रूशी निडरपणे मुकाबला केला. यात त्यांना बलिदान द्यावे लागले. या साहसाबद्दल त्यांना परमवीर चक्राने गौरविण्यात आले. याशिवाय १५ महावीर चक्र, ६० वीरचक्र यासह अनेक शौर्यपदक एसीसीएसला बहाल करण्यात आले. या शहिदांच्या स्मृती जपण्यासाठी एसीसीएसमध्ये सेंच्युरियन टँक ठेवण्यात आला आहे, जो लेफ्टनंट क्षेत्रपाल यांच्या युद्धताफ्यात सहभागी होता. भारत-पाक युद्धाची पार्श्वभूमी पूर्वी पाकिस्तानचा हिस्सा असलेल्या बांगलादेशने स्वतंत्र देशाची मागणी केली. त्याला पाकिस्तानचा विरोध होता. स्वतंत्र बांगलादेशसाठी तेथील नागरिकांनी बंडाचे निशाण फडकावले. ते चिरडून टाकण्यासाठी पाकिस्तानने बांगलादेशवर अत्याचार करणे सुरू केले. त्यामुळे बांगलादेशात हाहाकार उडाला. अनेक बांगलादेशी जीवाच्या आकांताने भारतात घुसू लागले. त्यामुळे भारताने या कारवाईत हस्तक्षेप करत पाकिस्तानला आव्हान दिले. ३ ते १७डिसेंबर असे चौदा दिवस हे युद्ध सुरू होते. अखेर भारतासमोर हात टेकवत १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी ले. जन. ए.ए.के. निमाजी यांनी आपल्या १३ हजार सैन्यानिशी भारतासमोर शरणागती पत्करली. एकीकडे भारताला विजय मिळाला, तर दुसरीकडे स्वतंत्र बांगलादेशचा जन्मही झाला.