शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जपून वापरा पाणी अन्यथा संकट!

By admin | Updated: November 29, 2014 00:00 IST

अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजच पाणी टंचाई आ वासून उभी राहिली आहे. जिल्ह्यातील शहरी भाग मात्र तुलनेने पाणी टंचाईच्या तीव्र झळांपासून अद्याप दूर आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजच पाणी टंचाई आ वासून उभी राहिली आहे. जिल्ह्यातील शहरी भाग मात्र तुलनेने पाणी टंचाईच्या तीव्र झळांपासून अद्याप दूर आहे. कोपरगाव, शिर्डी, कर्जत, अकोले या शहरांसाठी तातडीने उपाययोजना आवश्यक आहेत. अहमदनगर, श्रीरामपूर, संगमनेर, श्रीगोंदा या शहरातील नागरिकांना आज पाण्याच्या संकटाला तोंड द्यावे लागत नाही. मात्र पाणी जपून वापरले नाही, तर ही स्थिती कायम राहील, याची शाश्वती नाही. नगर शहरातील उपनगरे मात्र आजच पाण्यासाठी कासावीस आहेत. पावसाचे प्रमाण कमी असल्याने जिल्हा पुन्हा एकदा दुष्काळाच्या तोंडावर आहे. शहरी नागरिकांनी ‘पाणी वापरावे जपून’ हा मंत्र अंगीकारणेच अधिक योग्य ठरेल. ‘मुळा’त मुबलक साठा... : ‘मे’पर्यंत निवांत अहमदनगर : मुळा धरणात यंदा मुबलक पाणी साठा असल्याने नगर शहरातील पाणी पुरवठ्याची चिंता महापालिकेला नाही. धरणातील पाणी पातळी १७५२ फुटांच्या खाली गेल्यानंतरच शहर पाणी उपसा योजनेला घरघर लागण्यास सुरूवात होते. मात्र ही पातळी अजून ३ हजार फूट उंचीवर आहे. मे २०१५ पर्यंत तरी शहराच्या पाण्याची चिंता नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘मुळा’ धरणातील पाण्यावर शहराची तहान भागविली जाते. १९७३,१९८६,१९९७ आणि आता २००८ मध्ये १२४ कोटी रुपयांची पाणी योजना राबविण्यात आली. शहरासाठी राबविण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून लगतच्या ९ ग्रामपंचायतींना पाणी दिले जाते. शहरापासून मुळा धरण ३५ किमी अंतरावर असून तेथून शहराला पाणी पुरवठा होतो. शहराची लोकसंख्या चार लाखाच्या आसपास पोहचली आहे.शहरातील या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी ६२ दशलक्ष लीटर पाणी रोज लागते. धरणातून पाणी नगरपर्यत पोहचताना गळती होऊन प्रत्यक्षात ५२ दशलक्ष लीटर पाणी वितरण होते. मुळा धरणातील पाणी पातळी खालावली की शहराच्या पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होतो. यंदा मुळा धरणात मुबलक पाणी साठा आहे. धरणातील पाण्याची पातळी २ हजार फुटापेक्षाही अधिक आहे. १७५२ फुटाच्या खाली पाणी पातळी जाण्यास मे तरी उजाडेल असा महापालिका प्रशासनाचा अंदाज आहे.