साई जन्मस्ळाच्या वादावरुन शिर्डीत बंदला अभतपूर्व प्रतिसाद;  दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 11:04 IST2020-01-19T11:02:51+5:302020-01-19T11:04:04+5:30

साई जन्मभूमी वादाच्या मुद्यावर शिर्डीत बंदला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. दावे-प्रतिदावे, बंद दुर्लक्षित करून साईभक्तांनी दर्शनासाठी मोठ्याच मोठ्या रांगा लावल्या होत्या.

Unprecedented response to Shirdi bandh over Sai's birthday; Fellowship of devotees for darshan | साई जन्मस्ळाच्या वादावरुन शिर्डीत बंदला अभतपूर्व प्रतिसाद;  दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

साई जन्मस्ळाच्या वादावरुन शिर्डीत बंदला अभतपूर्व प्रतिसाद;  दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

शिर्डी : साई जन्मभूमी वादाच्या मुद्यावर शिर्डीत बंदला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. दावे-प्रतिदावे, बंद दुर्लक्षित करून साईभक्तांनी दर्शनासाठी मोठ्याच मोठ्या रांगा लावल्या होत्या. साईबाबांवरील भक्तांची श्रद्धा तर शिर्डीवर विश्वासाची मोहोर उमटवली आहे.
शनिवारी मध्यरात्रीनंतरच सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. सगळ्या बाजारपेठा बंद आहेत़ रिक्षा, तांगे, फळ विक्रेते या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. बंद अगोदरच जाहीर करूनही भाविकांच्या गर्दीवर कोणताही परिणात झालेला नाही. दर्शन व्यवस्था सुरूळीत सुरू आहे. संस्थान प्रसादालय रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सूरू होते. यानंतर पहाटे एक वाजेपासूनच प्रसादालयाचा भटारखाना सुरू झाला आहे़. रोज सकाळी १० वाजता प्रसादालय सुरू होते. आज सकाळी साडेनऊ वाजताच सुरू करण्यात आले आहे. 
    संस्थानने रोजच्या प्रमाणे नास्ता पाकिटांची व्यवस्था केली आहे. संस्थान कॅन्टीनमध्ये चहाचीही व्यवस्था आहे. विशेष म्हणजे ग्रामस्थांनी सकाळी दोन हजाराहून अधिक नास्ता पाकिटे आणून भाविकांना वाटली़. याशिवाय ग्रामस्थ भाविकांसाठी इडली, सांबर आदी प्रकारचा नास्ता बनवत असून सकाळी दहा नंतर ते भाविकांना देण्यात येणार आहे. भाविकांना स्वयंसेवक मार्गदर्शन करीत आहेत. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून ग्रामस्थ विशेष खबरदारी घेत आहेत. शहरातील गल्ल्यांमध्ये शांतता असली तरी मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला आहे.
 

Web Title: Unprecedented response to Shirdi bandh over Sai's birthday; Fellowship of devotees for darshan