नगर-पुणे महामार्गावर दुचाकी - ट्रकचा अपघात; दोन तरुण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 20:53 IST2018-12-08T20:50:50+5:302018-12-08T20:53:18+5:30

पळवेः नगर - पुणे हायवेवरील गव्हाणवाडी शिवारात झालेल्या अपघातामध्ये दोन तरूण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला.  ...

Two-wheeler accident on city-Pune highway; Two young people killed on the spot | नगर-पुणे महामार्गावर दुचाकी - ट्रकचा अपघात; दोन तरुण जागीच ठार

नगर-पुणे महामार्गावर दुचाकी - ट्रकचा अपघात; दोन तरुण जागीच ठार

ठळक मुद्देट्रकने दिली दुचाकीस्वारांना पाठीमागून धडकनगर- पुणे महामार्गावरील गव्हानवाडी जवळ घडली घटना

पळवेः नगर - पुणे हायवेवरील गव्हाणवाडी शिवारात झालेल्या अपघातामध्ये दोन तरूण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला. 


निलेश सुखदेव शेलार व(य 28 राळेगण म्हसोबा ता.नगर), योगेश दिलीप साळूंके वय 29.( केडगाव ता.नगर) हे दोघे जागीच ठार झाले. नगर - पुणे महामार्गावर गव्हाण वाडी हाॅटेल गुरुकृपा समोर हा अपघात झाला. 

 राळेगण येथून हे तरून बेकार्ड कंपनी कारेगाव येथे कामासाठी चालले होते. भरधाव वेगात मागून जोराची धडक बसल्याने हा अपघात झाला. त्यात एक तरुण संदिप धोत्रे( राळेगण ता.नगर) जखमी झाला आहे. अपघात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला.

Web Title: Two-wheeler accident on city-Pune highway; Two young people killed on the spot